"मला मध्यरात्री हॉटेलमध्ये बोलावलं अन्..."; अभिनेत्रीने सांगितला 'तो' वाईट अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 05:47 PM2024-07-29T17:47:50+5:302024-07-29T17:54:45+5:30

इंडस्ट्रीत आपला ठसा उमटवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. अभिनेत्रीलाही अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे.

when south director asked upasana singh to come to his hotel late at night | "मला मध्यरात्री हॉटेलमध्ये बोलावलं अन्..."; अभिनेत्रीने सांगितला 'तो' वाईट अनुभव

"मला मध्यरात्री हॉटेलमध्ये बोलावलं अन्..."; अभिनेत्रीने सांगितला 'तो' वाईट अनुभव

अभिनेत्री उपासना सिंग तिच्या कॉमिक टायमिंगसाठी ओळखली जाते. अभिनेत्री वर्षानुवर्षे इंडस्ट्रीत एक्टिव्ह असून कॉमेडी करून चाहत्यांचं मनोरंजन करत आहे. कपिल शर्माच्या शोमध्येही दिसली होती. इंडस्ट्रीत आपला ठसा उमटवण्यासाठी उपासनाने खूप मेहनत घेतली आहे. अभिनेत्रीलाही अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. एकदा एका साऊथच्या डायरेक्टरने तिला हॉटेलमध्ये बोलावलं होतं, त्यामुळे ती खूप चिडली होती

ई-टाइम्सशी बोलताना उपासना म्हणाली की, "मला चित्रपट सोडावे लागले. मी नाव घेणार नाही, पण साऊथचा एक डायरेक्टर आहे, ज्याने मला साईन केलं होतं. मी अनिल कपूरसोबत काम करणार असल्याचं माझ्या नातेवाईकांना सांगितलं. डायरेक्टरने मला मध्यरात्री त्याच्या हॉटेलमध्ये बोलावलं. त्यावेळी मी फक्त १७ वर्षांची होती आणि खूप निरागस होती. हॉटेलमध्ये जाण्यासाठी माझ्याकडे गाडी नसल्याने मी दुसऱ्या दिवशी येईन असं सांगितलं."

"डायरेक्टर म्हणाला, माझ्यासाठी तो गाडी पाठवतोय. त्यानंतर त्याने मला तुला सिटींगचा अर्थ माहीत नाही का? फिल्म लाईनमध्ये येण्यासाठी सिटींग करावं लागतं असं म्हटलं. हे ऐकल्यावर मला खूप राग आला. तो माझ्याशी असं कसं बोलू शकतो? मी त्याच्या ऑफिसमध्ये त्याला खडसावलं आणि म्हणाले - तू माझ्या वडिलांच्या वयाचा आहेस. तू माझ्याबद्दल असा विचार कसा करू शकतोस?' मग मी खूप रडले."

"मला आठवतंय की, मी वांद्रे येथे रस्त्याने चालत होती, रडत होती आणि मी अनिल कपूरसोबत चित्रपट करणार असल्याचं आधी सांगितलं होतं. आता नातेवाईकांना काय वाटेल असा प्रश्न पडला. सगळा गोंधळ झाला होता. मी पुढचे सात दिवस घराबाहेर पडले नाही. माझ्या आईने मला धीर दिला आणि सांगितलं की मी योग्य ते केले आहे" असं देखील अभिनेत्रीने म्हटलं आहे. 
 

Web Title: when south director asked upasana singh to come to his hotel late at night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.