शक्तीमानच्या नाकी नऊ आणणारा शैतान सायंटिस्ट डॉक्टर जैकाल आता कुठे आहे आणि काय करतो?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 02:20 PM2022-01-18T14:20:13+5:302022-01-18T14:24:54+5:30
doctor jackal aka Lalit Parimoo : त्या काळात या सुपरहिरो मालिकेने कमालीची लोकप्रियता मिळवली होती. कितीही महत्वाचं काम असो रविवारी दुपारी १२ वाजता ही मालिका बघण्यासाठी टीव्हीसमोर गर्दी होत होती.
doctor jackal aka Lalit Parimoo : मार्वल सीरीजचे आयर्न मॅन, स्पायडर मॅन आणि बॅट मॅन असे कितीही सुपरहिरोंचे सिनेमे आज हिट असतील, पण ९०च्या काळातील मुलांच्या मनात शक्तीमानची (Shaktimaan) एक स्पेशल जागा आहे. त्या काळात या सुपरहिरो मालिकेने कमालीची लोकप्रियता मिळवली होती. कितीही महत्वाचं काम असो रविवारी दुपारी १२ वाजता ही मालिका बघण्यासाठी टीव्हीसमोर गर्दी होत होती.
शक्तीमानचा टीआरपी खूप जास्त होता. आजकालच्या मालिकांना तो टीआरपी गाठणं शक्यही नाही. शक्तीमानमध्ये सुपरहिरो एकच होता, पण यात व्हिलन अनेक होते. पण एक परमनंट व्हिलनही होता. ज्याला आपण 'डॉक्टर जैकाल' नावाने आपण ओळखतो डॉक्टर जैकालने 'पॉवर' बोलून शक्तीमानच्या नाकी नउ आणले होते.
साधारण ५२० एपिसोड झाल्यावर ही मालिका बंद झाली. त्यानंतर डॉक्टर जैकालची भूमिका साकारणारे ललि परिमू हेही टीव्हीच्या विश्वातून अचानक गायब झाले. ते नुकतेच पॉप्युलर वेबसीरीज 'स्कॅम १९९२'मध्ये दिसले होते. चला जाणून घेऊ ते आता कुठे आहेत आणि काय करतात?
शक्तीमानाने दिली होती ओळख
डॉक्टर जैकालची भूमिका साकारून ललित परिमू यांनी वेगळ्या भूमिका तर खूप केल्या. पण त्यांना खरी लोकप्रियता मिळाली शक्तीमान मालिकेतून. 'पॉवर' फारच पॉवरने बोलणारे ललित हे शक्तीमान मालिकेत एक ग्रेट शैतान सायंटिस्ट होते. हा सायंटिस्ट शक्तीमानचा सर्वात मोठा वैरी आणि शैतानांचा सरदार तमराज किलविशसाठी काम करत होता.
'शक्तीमान'नंतर अनेक सिनेमांच्या ऑफर
शक्तीमान ऑफ एअर झाल्यावर ललित यांच्याकडे अनेक सिनेमांच्या ऑफर आल्या. अनेक भूमिका त्यांनी स्वीकारल्या सुद्धा. ते 'हज़ार चौरासी की मां', 'हम तुम पर मरते हैं', 'एजेंट विनोद' आणि 'हैदर' सारख्या सिनेमात दिसले. या सिनेमातील त्यांच्या कामाचं चांगलंच कौतुक झालं. ते अलिकडे 'स्कॅम १९९२'मध्ये दिसले होते.
आता काय करतात?
ललित यांनी साधारण १०० पेक्षा जास्त मालिकांमध्ये काम केलं आहे. त्यांच्या अभिनयाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. सिनेमात आणि मालिकांमध्ये साकारलेल्या भूमिकांमध्ये ते जीव ओतून काम करतात. सध्या ते एक अॅक्टिंग अकॅडमी चालवतात. अभिनयाच्या क्षेत्रात आपलं करिअर करण्याची इच्छा असणाऱ्या तरूणांना ते या अभिनयाचे धडे देतात.