लग्नाच्या १० महिन्यांतच मोडला संसार, बिपाशा बासूच्या पतीनं दिला धोका, सध्या कुठेय श्रद्धा निगम?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2023 08:00 AM2023-10-01T08:00:00+5:302023-10-01T08:00:02+5:30
श्रद्धासोबत घटस्फोट झाल्यानंतर करणने २०१२ मध्ये जेनिफर विंगेटसोबत लग्न केलं.
टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेता करण सिंग ग्रोव्हरने तीन लग्न केले आहेत. अभिनेत्री बिपाशा बासूसोबत लग्न करणाऱ्या करणचे यापूर्वी दोन वेळा घटस्फोट झालेला आहे. यामध्येच त्याच्या पहिल्या पत्नीचा म्हणजेच अभिनेत्री श्रद्धा निगमचा (Shraddha Nigam) आज वाढदिवस आहे. करण सिंग ग्रोवरने २००८ मध्ये श्रद्धा निगमसोबत लग्न गाठ बांधली होती. मात्र, केवळ वर्षभरामध्येच या दोघांचा कायदेशीररित्या घटस्फोट झाला.
श्रद्धा निगम छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'चुडियाँ' या मालिकेच्या माध्यमातून तिने कलाविश्वात पदार्पण केलं आहे. श्रद्धा मुळची मध्य प्रदेशमधील इंदूर येथील असून तिने पुण्यातील सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमधून फॅशन डिझायनिंगचा कोर्स पूर्ण केला. श्रद्धाने 'चुडियाँ' मालिकेनंतर 'मानो या ना मनो', 'कहानी घर घर की' आणि 'कृष्ण अर्जुन' यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केलं.
करण सिंग ग्रोव्हर आणि श्रद्धा निगम यांनी अनेक वर्षांच्या अफेअरनंतर लग्न केले होते. श्रद्धा आणि करण मध्ये सगळे काही सुरळीत सुरू असल्याचे सगळ्यांना वाटत होते. पण श्रद्धासोबत लग्न झाल्यावर काहीच महिन्यात त्याच्या आयुष्यात निकोल अल्वरस आली. निकोल झलक दिखला जा या कार्यक्रमात त्याची कोरिओग्राफर होती. श्रद्धाला हे कळताच तिने लग्नाच्या दहा महिन्यात त्याला घटस्फोट दिला. पण खरी गंमत म्हणजे श्रद्धासोबत लग्न करूनही करण निकोल आणि जेनिफर विंगेट यांना एकत्र डेट करत होता. त्याने श्रद्धासोबत घटस्फोट घेतल्यानंतर निकोलशी लग्न न करता जेनिफरशी लग्न केले.
करणने घटस्फोट दिल्यानंतर श्रद्धाला चांगलाच मानसिक धक्का बसला होता. यानंतर श्रद्धाने डिसेंबर 2012 मध्ये अभिनेता मयंक आनंदसोबत लग्न केलं. श्रद्धा आणि मयंक दोघेही आता फॅशन डिझायनिंगचे काम करतात. सध्या श्रद्धा टीव्हीच्या जगापासून दूर आहे. श्रद्धासोबत घटस्फोट झाल्यानंतर करणने २०१२ मध्ये जेनिफर विंगेटसोबत लग्न केलं. परंतु, 2016 मध्ये जेनिफरने करणला घटस्फोट दिला. एप्रिल 2016 मध्ये करणने अभिनेत्री बिपाशा बसूसोबत तिसरे लग्न केले. दोघांना देवी नावाची मुलगी देखील आहे.