Devoleena Bhattacharjee : लग्नानंतर देवोलिनाची पहिली पोस्ट, शेअर केले लग्नाचे फोटो; कोण आहे ‘गोपी बहू’चा पती?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 11:54 AM2022-12-15T11:54:14+5:302022-12-15T11:54:41+5:30

Devoleena Bhattacharjee : छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी हिने काल लग्नगाठ बांधली. अगदी गुपचूप लग्न करत देवोलिनाने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

Who Is Devoleena Bhattacharjee Husband shahnawaz sheikh | Devoleena Bhattacharjee : लग्नानंतर देवोलिनाची पहिली पोस्ट, शेअर केले लग्नाचे फोटो; कोण आहे ‘गोपी बहू’चा पती?

Devoleena Bhattacharjee : लग्नानंतर देवोलिनाची पहिली पोस्ट, शेअर केले लग्नाचे फोटो; कोण आहे ‘गोपी बहू’चा पती?

googlenewsNext

छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee) हिने काल लग्नगाठ बांधली. अगदी गुपचूप लग्न करत देवोलिनाने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. तिच्या मेहंदी, संगीत व लग्नाचे फोटो व्हायरल झालेत, तेव्हा कुठे चाहत्यांना तिच्या लग्नाबद्दल कळलं. आता देवोलिनाचा पती कोण? हे जाणून घेण्यास साहजिकच चाहते उत्सुक आहेत. तर देवोलिनाने शाहनवाज शेख ( Shahnawaz Sheikh  ) याच्याशी लग्नगाठ बांधली आहे. गेल्या दोन वर्षांपासून देवो व शाहनवाज एकमेकांना डेट करत होते. लग्नानंतर देवोलिनाने पहिली पोस्ट केली. पतीसोबतचे काही फोटो तिने शेअर केलेत.

‘आणि होय, मी अभिमानाने सांगू शकते की मी त्याची आहे आणि हो... शोनू, चिराग लेकर भी ढूंढती तो तुझ जैसा नहीं मिलता... तू माझ्या दु:खावरचं उत्तर आहेत... आय लव्ह यू शोनू.... माझ्या आयुष्यातील मिस्ट्री मॅन आणि तुम्हा सर्वांचा जीजू शोनू...’ अशा आशयाची पोस्ट तिने शेअर केली आहे.

कोण आहे देवोलिनाचा पती?
देवोलिना भट्टाचार्जीटेलिव्हिजनचा एक लोकप्रिय चेहरा आहे. आता ती शाहनवाज शेखची पत्नी आहे. शाहनवाज शेख हा जिम ट्रेनर आहे. बिग बॉस 13 दरम्यान देवोलिनाने ती नात्यात असल्याचा खुलासा केला होता. मी घराबाहेर कुणाला तरी डेट करत असल्याचं तिने सांगितलं होतं. अर्थात त्याचा नावाचा खुलासा करणं तिने टाळलं होतं. देवोलिना व शाहनवाज यांची भेट जिममध्ये झाली. ‘साथिया’ शोदरम्यान देवोलिनाचा अपघात झाला होता. यादरम्यान शाहनवाज तिचा आधार बनला. त्याने तिला पुन्हा उठून उभं केलं. शाहनवाजच्या प्रेमळ स्वभावाने देवोलिनाचं मन जिंकलं आणि ती त्याच्या प्रेमात पडली. सुमारे दोन वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केलं.

का केलं गुपचूप लग्न?
देवोलिनाने अगदी गुपचूप लग्न केलं. यामागचं कारणही समोर आलं आहे. हिंदुस्तान टाइम्सने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, शाहनवाज व त्याच्या कुटुंबाला ग्रँड वेडिंग नको होतं. 14 डिसेंबरला दोघांनी कोर्ट मॅरेज केलं. मुंबईत हे लग्न झालं. यानंतर लोणावळ्यात दोघांनीही लग्नाचं सेलिब्रेशन केलं. यावेळी अगदी मोजके लोक उपस्थित होते.

Web Title: Who Is Devoleena Bhattacharjee Husband shahnawaz sheikh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.