Bigg Boss Marathi 2 : कोण म्हणाला अभिजीत केळकरला बिग बॉस मराठीच्या घरातील सर्वोत्त्म स्पर्धक ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2019 14:05 IST2019-08-01T13:44:46+5:302019-08-01T14:05:10+5:30
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सध्या सुरू असलेल्या टास्कमध्ये बिग बॉस घरातील सदस्यांना त्यांच्या कुटुंबातील जवळच्या व्यक्तींना भेटण्याची संधी देत आहेत.

Bigg Boss Marathi 2 : कोण म्हणाला अभिजीत केळकरला बिग बॉस मराठीच्या घरातील सर्वोत्त्म स्पर्धक ?
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सध्या सुरू असलेल्या टास्कमध्ये बिग बॉस घरातील सदस्यांना त्यांच्या कुटुंबातील जवळच्या व्यक्तींना भेटण्याची संधी देत आहेत. इतक्या दिवसांनी आपल्या प्रिय व्यक्तींना भेटून भावुक होण स्वाभाविकच... काल किशोरी शहाणे यांचा मुलगा बॉबी, शिवानी सुर्वेचे वडील, नेहाचा शितोळेचा नवरा नचिकेत, हीनाची आई घरामध्ये येऊन गेली.
हीना शिवानीच्या वडिलांना भेटून खूप भाऊक झाली... आज कोण कोणत्या सदस्यांना सरप्राईझ मिळणार ? हे बघणे रंजक असणार आहे... आज अभिजीत केळकरची मुलं त्याला घरामध्ये भेटायला येणार आहेत...
अभिजीतला व्हिडिओ क्लिपिंगद्वारे एक संदेश पाठवला आहे... ज्यामध्ये ते म्हणाले, “अभिजीत तू बिग बॉसच्या घरातील सर्वोत्त्म स्पर्धक आहेस असे आम्हाला वाटते. तू खूप छान खेळतो आहेस याचा आम्हाला अभिमान आहे... तुझ्या कर्तुत्वानेच तू पुढे गेला आहेस, अशीच मेहेनत कर आणि प्रगती करून यश मिळव...” हे सगळे एकुन अभिजीतला अश्रु अनावर झाले... तर त्याच्या मुलांसोबत त्याने काही क्षण घालवले... ज्यामध्ये अभिजीतने मुलांना सांगितले “मी इथे मस्त जेवण बनवायला शिकलो आहे, प्रोन्स, सँडविच, फ्रंकी... मी घरी आलो की नक्की बनवणार आहे”... अभिजीतच्या मुलांना बघून घरातील सदस्यांना देखील खुप आनंद झाला ... अजून घरामध्ये काय काय घडले हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे.