शीतली आणि अज्याच्या लग्नात कोण आणणार विघ्न?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2018 07:36 AM2018-05-07T07:36:21+5:302018-05-07T13:06:21+5:30
'लाखात एक माझा फौजी' असं म्हणत प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या झी मराठी वाहिनीवरील ''लगीरं झालं जी'' या लोकप्रिय मालिकेने नुकताच ...
' ;लाखात एक माझा फौजी' असं म्हणत प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या झी मराठी वाहिनीवरील ''लगीरं झालं जी'' या लोकप्रिय मालिकेने नुकताच ३०० भागांचा टप्पा गाठला. प्रेक्षकांच्या अखंड प्रेमामुळे ही मालिका हे यश आणि टीआरपीचे उच्चांक गाठू शकली. शीतली आणि अज्याची प्रेमकथा प्रेक्षकांनाही भावात आहे तशीच ती आपलीशी देखील वाटत आहे.
अज्या आणि शीतलीचं प्रेम पुष्पा मामी, भैय्यासाहेब म्हणजेच हर्षवर्धन आणि जयडीच्या डोळ्यात खुपतंय. शीतल आणि अजिंक्यच्या लग्नाला दोन्ही घरातून होकार मिळाल्यामुळे त्यांची अस्वस्थता अजूनच वाढली आहे. रिवाजानुसार मुलगी बघण्याचा कार्यक्रम देखील पार पडतो. अजिंक्य गावात आल्यानंतर जाणूनबुजून त्याच्याशी गोड मामी, शीतल आणि तिच्या घरच्यांचा पाणउतारा करण्याची एकही संधी सोडत नाही आहे. शीतल आणि अजिंक्यच्या लग्नाची घरात चाललेली तयारी बघून जयश्री अस्वस्थ होते.आपल्या हातून सगळं सुटतंय या विचाराने ती बिथरते आणि अजिंक्यच्या आधी माझं लग्न करा असं घरी सांगते. जयश्रीच्या या मागणीने सगळ्यांनाच धक्का बसतो. शीतल आणि अजिंक्यच्या लग्नात अडथळा निर्माण करण्याचा जयडीचा हा डाव यशस्वी होईल का? जयडी शीतल आणि अज्याला एकमेकांपासून तोडेल का? हे प्रेक्षक लवकरच पाहू शकतील.
या मालिकेत किरण ढाने प्रेक्षकांना एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे.किरण या मालिकेत जयश्री म्हणजेच जयडीची भूमिका साकारत आहे.'लागीरं झालं जी' या मालिकेत बहुतेक सर्व कलाकार याच भागातले स्थानिक कलाकार आहेत.किरण देखील साताऱ्यात राहाणारी आहे.ती तेथील कॉलेजमधून शिक्षण घेत आहे.या मालिकेत अगदी साधी भोळी दिसणारी किरण ही तिच्या खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे.ती लागीरं झालं जी या मालिकेत नेहमीच पंजाबी ड्रेसमध्ये पाहायला मिळते. तसेच या मालिकेत ती केसांची वेणी घालते.पण खऱ्या आयुष्यात ती वेस्टर्न कपडे घालते तसेच अनेक वेळा तिचे केस मोकळेच असतात.किरण तिच्या जयश्री या व्यक्तिरेखेपेक्षा खऱ्या आयुष्यात खूपच वेगळी दिसते.त्यामुळे खऱ्या आयुष्यात किरण तुमच्यासमोर आली तर तुम्ही नक्कीच तिला ओळखू शकणार नाही याची आम्हाला खात्री आहे.