ट्रान्सजेंडरना मान सन्मान केवळ नवरात्रीपुरताच मर्यादित का असतो ? गंगाने उपस्थित केला प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2020 02:55 PM2020-10-17T14:55:56+5:302020-10-17T15:03:40+5:30
'युवा डान्सिंग क्वीन'च्या निमित्ताने गंगा प्रकाशझोतात आली होती. गंगा एक ट्रान्सजेंडर आहे. तिचे खरे नाव प्रणित हाटे. गंगा एक ट्रान्सजेंडर असून तिचे याआधीचे फोटो पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही
'युवा डान्सिंग क्वीन'च्या निमित्ताने गंगाने सर्वांचे लक्ष वेधले होते. गंगाचे मुळ नाव प्रणीत हाटे आहे. गंगा पुन्हा चर्चेत आली आहे. नेहमीच ट्रान्सजेंडरला फक्त नवरात्रीच सर्वाधिक मान सन्मान दिला जातो? असे का असा प्रश्न उपस्थित करत पुन्हा एकदा ट्रान्सजेंडर असलेल्या गंगाला हा प्रश्न सध्या भेडसावत आहे.
'युवा डान्सिंग क्वीन'च्या निमित्ताने गंगा प्रकाशझोतात आली होती. गंगा एक ट्रान्सजेंडर असून तिचे याआधीचे फोटो पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही की हाच प्रणित आता गंगा म्हणून समोर आला आहे. प्रणितचा गंगा बनण्यापर्यंतचा प्रवास हा सोपा नव्हता. लहानपणापासून वाट्याला आलेली हेटाळणी, अपमान सहन करावा लागला.
गंगाने शोमध्ये अनेक प्रसंग सांगितले. टॉयलेटला जायचे असायचे तेव्हा मला क्लास सुरु असतानाच जावे लागायचे. क्लास सुरु असताना टॉयलेटला जाण्यासाठी हात वर केला की अजून दोन तीन हात वर यायचे. ते विद्यार्थी माझ्या मागे यायचे. माझी टर उडवायचे. हा अपमान, ते टोमणे सहन करणे प्रचंड तणावाचे होते. कारण माझ्यासोबत हे काय सुरु आहे, हेच मला कळत नव्हते. आपण जे काही आहोत, त्यामुळे आपल्याला बायल्या ठरवले जातेय, इतकेच त्यावेळी कळत होते.'
तू साडी नेसून मिरवण्याच्या लायकीची तेवढी आहे, असे लोक मला तोंडावर म्हणायचे. त्याच लोकांना मी आज सांगू इच्छिते की, हो मी साडी नेसण्यास तयार आहे. कारण माझ्यात तितकी हिंमत आहे. प्रणित ते गंगा या प्रवासात माझ्या कुटुंबाने मला खूप मोठा आधार दिला. पण आजही माझ्यासारख्या अनेकांना आधाराची गरज आहे, असेही ती म्हणाली.
माझ्यासोबत मैत्रीच काय पण बोलायलाही लोक कचरायचे. पण आज गंगाने स्वतःला सिद्ध केले आहे. पूर्वी आलेली मान अपमान आता कुठेतरी सन्मानात बदलत असला तरी तो केवळ नवरात्रीपुरताच राहू नये इतर दिवशी तितकाच आदर त्यांना दिला जावा जसे सर्वांना मिळतो इतकीच काय ती अपेक्षा असल्याचे गंगाने म्हटले आहे.