​शबानाने आठ तासांसाठी का केला अन्न-पाण्याचा त्याग?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2016 05:34 PM2016-10-24T17:34:27+5:302016-10-24T17:34:27+5:30

शबाना आझमी सध्या एक माँ जो लाखों के लिये बनी अम्मा या मालिकेत अम्मा ही प्रमुख भूमिका साकारत आहे. ...

Why did Shaban give food and water for eight hours? | ​शबानाने आठ तासांसाठी का केला अन्न-पाण्याचा त्याग?

​शबानाने आठ तासांसाठी का केला अन्न-पाण्याचा त्याग?

googlenewsNext
ाना आझमी सध्या एक माँ जो लाखों के लिये बनी अम्मा या मालिकेत अम्मा ही प्रमुख भूमिका साकारत आहे. शबाना आझमी यांनी अनेक चित्रपटात एकापेक्षा एक सरस भूमिका साकारल्या आहेत. पण मालिकेत काम करण्याची त्यांची ही पहिलीच वेळ आहे. या मालिकेतील प्रत्येक दृश्य चांगल्याप्रकारे चित्रीत व्हावे यासाठी त्या प्रयत्न करत आहेत. तसेच कथेतील बारीकसारीक गोष्टीवरदेखील त्या संशोधन करतात. या मालिकेत कबीरलाल सरस्वती आणि काही मुलींना पऴवून नेतो आणि त्यांना विकण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्याशी मारामारी करून अम्मा मुलींना परत आणते असे दृश्य चित्रीत करायचे होते. हे दृश्य चित्रीत करण्यासाठी त्यांना जवळजवळ आठ तास लागले. या आठ तासात शबाना आझमी यांनी काहीही खाल्ले नाही की एक थेंब पाणीदेखील प्यायले नाही. तसेच हे चित्रीकरण ज्या ठिकाणी सुरू होते, तिथे थोडीदेखील हवा येत नव्हती. याविषयी शबाना आझमी सांगतात, "मी आतापर्यंत चित्रीत केलेले हे सगळ्यात अवघड दृश्य होते. आम्ही तिसऱ्या मजल्यावर चित्रीकरण करत होते. तिथे थोडीसुद्धी हवा येत नव्हती. त्यामुळे गुदमरल्यासारखे होत होते. मी पंखा हातात घेऊन वारा घालायचा प्रयत्न करत होते. पण त्याचादेखील काहीच फायदा होत नव्हता. मला हे चित्रीकरण पूर्ण करण्यासाठी जवळजवळ आठ तास लागले. पण चित्रीकरण खूप चांगले झाल्याचे मला समाधान मिळाले. या दरम्यान मला पाणी प्यायला किंवा काहीही खायलादेखील वेळ मिळाला नाही."

Web Title: Why did Shaban give food and water for eight hours?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.