​प्रत्युषा बॅनर्जीच्या शॉर्ट फिल्ममुळे काम्या पंजाबीला खावी लागणार का जेलची हवा?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2017 07:34 AM2017-04-03T07:34:09+5:302017-04-03T13:04:09+5:30

बालिकावधू या मालिकेमुळे प्रत्युषा बॅनर्जी नावारूपाला आली. ही तिची पहिलीच मालिका असली तरी या मालिकेतील तिच्या भूमिकेचे प्रचंड कौतुक ...

Why does Kamya Punjabi eat food because of Pratyusha Banerjee's short film? | ​प्रत्युषा बॅनर्जीच्या शॉर्ट फिल्ममुळे काम्या पंजाबीला खावी लागणार का जेलची हवा?

​प्रत्युषा बॅनर्जीच्या शॉर्ट फिल्ममुळे काम्या पंजाबीला खावी लागणार का जेलची हवा?

googlenewsNext
लिकावधू या मालिकेमुळे प्रत्युषा बॅनर्जी नावारूपाला आली. ही तिची पहिलीच मालिका असली तरी या मालिकेतील तिच्या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले होते. यानंतर ती झलक दिखला जा, बिग बॉस यांसारख्या रिअॅलिटी शोमध्ये झळकली. राहुल राज सिंह या तिच्या प्रियकरासोबत तिने पॉवर कपल या कार्यक्रमातदेखील भाग घेतला होता. तिने हम है ना, ससुराल सिमर का यांसारख्या मालिकांमध्येदेखील काम केले आहे. 
प्रत्युषाने प्रसिद्धीझोतात असतानाच 1 एप्रिल 2016ला आत्महत्या केली. तिने तिच्या राहात्या घरी गळफास घेतला होता. राहुलने तिला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केले होते असा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. प्रत्युषाला जाऊन नुकतेच वर्षं झाले आहे. तिच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने हम कुछ कह ना सके हा लघुपट तिची मैत्रीण काम्या पंजाबीने प्रदर्शित केला आहे. या लघुपटाची कथा ही प्रत्युषाच्या आयुष्याशी सार्धम्य राखणारी आहे. प्रत्युषाचे आयुष्य, तिचे राहुलसोबतचे नाते या सगळ्याचा यात उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे हा लघुपट प्रदर्शित होऊ नये यासाठी राहुलने अनेक प्रयत्न केले होते. काम्या पैसे कमवण्यासाठी प्रत्युषाच्या नावाचा वापर करत आहे असे यावर राहुलने म्हटले होते. तसेच प्रत्युषाने अशाप्रकारच्या कोणत्या लघुपटात काम केले नव्हते असाही राहुलने दावा केला होता. राहुलने याविरोधात कोर्टात याचिका दाखल केली होती आणि त्यावर कोर्टाने या लघुपटाच्या प्रदर्शनावर स्थगिती आणली होती. पण तरीही काम्याने नुकताच तो लघुपट प्रदर्शित केला. याविषयी राहुलच्या वकिलांनी एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, कोर्टाने लघुपट प्रदर्शित होऊ नये म्हणून त्यावर स्थगिती दिली आहे आणि त्याबातचे कागदपत्र काम्याला पाठवण्यात आले आहे. काम्याच्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीने त्यावर साइनदेखील केली आहे. लघुपट प्रदर्शित करून काम्याने कोर्टाचा अपमान केला आहे आणि त्याबद्दल तिला सहा महिन्याची जेलदेखील होऊ शकते. 

Web Title: Why does Kamya Punjabi eat food because of Pratyusha Banerjee's short film?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.