'दूर रह कर मोहब्बत कम हो जाती है...?', असं का म्हणताहेत पाठकबाई उर्फ अक्षया देवधर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 13:22 IST2023-03-10T13:21:20+5:302023-03-10T13:22:19+5:30
Akshaya Deodhar : अक्षया देवधर हिने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओने आणि त्यावरील कॅप्शननं चाहत्यांचं लक्ष वेधून घेतले आहे.

'दूर रह कर मोहब्बत कम हो जाती है...?', असं का म्हणताहेत पाठकबाई उर्फ अक्षया देवधर
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कपलपैकी एक कपल म्हणजे हार्दीक जोशी (Hardik Joshi) आणि अक्षया देवधर (Akshaya Deodhar). तुझ्यात जीव रंगला मालिकेतून राणादा आणि पाठकबाईंच्या भूमिकेतून हार्दिक आणि अक्षयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. हे रिल लाइफ कपल रिअल आयुष्यातही एक झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांनी लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्न सोहळ्याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. दरम्यान आता अक्षया देवधर हिने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओने आणि त्यावरील कॅप्शननं चाहत्यांचं लक्ष वेधून घेतले आहे.
अक्षया देवधर सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. दरम्यान आता तिने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडीओत ती वेगळ्याच लूकमध्ये दिसते आहे. तिने हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, आज भी तुम्हारा नाम बताती हूं,जब इश्क की बात आती है.. तुम्हे क्या लगा, दूर रह कर मोहब्बत कम हो जाती है?
अक्षया देवधरच्या या लूकला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळत आहे. तिच्या या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे. अक्षया देवधर सध्या कोणत्या मालिकेत काम करताना दिसत नाही. तर हार्दिक जोशी सन मराठी वाहिनीवरील सुंदरी मालिकेत सध्या पाहायला मिळतो आहे. अक्षया आणि हार्दिकचे चाहते त्या दोघांना पुन्हा एकदा एकत्र काम करताना पाहण्यासाठी उत्सुक आहेत.