'जीजाजी छत पर हैं'मध्‍ये इलायची वागणार लहान मुलांसारखी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 06:23 PM2019-04-24T18:23:36+5:302019-04-24T18:24:04+5:30

सोनी सबचा जीजाजी छत पर हैं मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडते आहे.

Why is Elaichi behaving like a child on Sony SAB's Jijaji Chhat Per Hain | 'जीजाजी छत पर हैं'मध्‍ये इलायची वागणार लहान मुलांसारखी

'जीजाजी छत पर हैं'मध्‍ये इलायची वागणार लहान मुलांसारखी

googlenewsNext


सोनी सबचा जीजाजी छत पर हैं मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडते आहे. इलायची (हिबा नवाब)ला आयुष्‍यात घडणाऱ्या गोष्‍टी आधीच दिसत असल्‍याने हे पाहणे मनोरंजक असेल की, आगामी एपिसोड्समध्‍ये तिला कोणती स्‍वप्‍न पडणार आहेत.

इलायचीला भविष्यात घडणाऱ्या घटना स्‍वप्‍नात दिसतात. मात्र, यामुळे ती काहीशी चिंतीत झाली आहे. कारण, स्‍वप्‍नात तिला दिसते मुरारी (अनुप उपाध्‍याय) पंचम (निखिल खुराणा)च्‍या मागे चाकू घेऊन पळत आहे आणि तो त्‍याला मारू इच्छितो.

इलायचीची स्‍वप्‍ने पूर्ण होत असल्‍याने पंचम आता घाबरला आहे आणि आपला जीव वाचवण्‍यासाठी तो मुरारीपासून दूर पळतो आहे. तर दुसरीकडे, पिंकी सतत इलूला शोधण्‍याचा प्रयत्‍न करत आहे, जो कमिशनरच्‍या मुलाकडून आलेला आणखी एक योग्‍य जोडीदार आहे.

एका अपघातादरम्‍यान झालेल्‍या आघातामुळे इलायचीचा स्‍मृतीभ्रंश होतो. ती एक लहान मुलाप्रमाणे वागायला लागते. तसेच सध्‍याच्‍या कोणत्‍याच गोष्‍टी तिला आठवत नाहीत. तर कुटुंबातील सदस्‍य संभ्रमात आहेत की, हे वास्‍तवात खरे आहे की ती नाटक करते आहे. घरात सर्वांचेच लक्ष इलायचीकडे आहे. इलायचीला खरोखरंच काही आठवत नाही की, ही तिची आणखी एक युक्‍ती आहे?


इलायचीची भूमिका साकारणारी हिबा नवाब म्‍हणाली, इलायचीकडे आता बऱ्याच युक्‍त्‍या आहेत. पंचम सोबत आपले लग्‍न करून देण्‍यासाठी वडिलांना मनवण्‍याच्‍या सतत प्रयत्‍नात असलेली इलायची आता लहान मुलाप्रमाणे वागत आहे. मला हा ट्रॅक करताना खूप मजा येत आहे. हे गतकाळामध्‍ये परतल्‍याप्रमाणे आहे, खेळणे-बागडणे आणि मनमुराद जगणे. दर्शकांना हे पाहताना आनंद होणार आहे की, कशाप्रकारे इलायची आपल्‍या जीवनातील अडथळ्यांना पार करते.

Web Title: Why is Elaichi behaving like a child on Sony SAB's Jijaji Chhat Per Hain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.