तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत गोकुळधामवासीयांनी का बदलले आपले रूप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2017 05:02 PM2017-01-16T17:02:19+5:302017-01-16T17:02:19+5:30

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत गोकुळधामवासीय आता प्रेक्षकांना एका वेगळ्या रूपात पाहायला मिळणार आहेत. गोकुळधाममधील कोणत्याही व्यक्तीवर ...

Why is Gokuldham's change in the series of Tarak Mehta's reverse glasses? | तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत गोकुळधामवासीयांनी का बदलले आपले रूप

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत गोकुळधामवासीयांनी का बदलले आपले रूप

googlenewsNext
रक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत गोकुळधामवासीय आता प्रेक्षकांना एका वेगळ्या रूपात पाहायला मिळणार आहेत. गोकुळधाममधील कोणत्याही व्यक्तीवर संकट ओढवले तर या सोसायटीमधील सगळेच त्यांच्या मदतीसाठी नेहमीच धावून जातात. आता गोकुळधाम सोसायटीतील एकमेव सेक्रेटरी आत्माराम तुकाराम भिडे एका संकटात सापडला आहे. त्याची स्कूटर म्हणजे त्याचा जीव की प्राण आहे. याच त्याच्या स्कूटरचे म्हणजेच सखारामचे आता एका गुंडाने अपहरण केले आहे आणि याच सखारामची सुटका करण्यासाठी गोकुळधामवासीय प्रयत्न करणार आहेत. 
सखारामची सुटका करण्यासाठी गोकुळधामवासीय एका वेगळ्या रूपात त्या गुंडाला भेटायला जाणार आहेत. यासाठी जेठालाल, अय्यर आणि पोपटलाल आपले रूप बदलणार आहेत. ते तिघेही मिशी आणि दाढी लावून एक नवीन रूप धारण करणार आहेत. सखाराम ज्या गुंडाकडे आहे, त्या गुंडाला आइस्क्रीम खूप आवडते असे त्यांना कळणार आहे. त्यामुळे ते आइस्क्रीमविक्रेते बनून त्याच्या भेटीस जाणार आहेत. मालिकेच्या या भागासाठी त्या तिघांचाही मेकअप खूपच छान करण्यात आला आहे. पोपटलालला तर या गेटअपमध्ये ओळखणेदेखील प्रेक्षकांना कठीण जाणार आहे. याविषयी या मालिकेत जेठालालची भूमिका साकारणारा दिलीप जोशी सांगतो, "आमच्या मेकअपदादांनी आमचा इतका चांगला मेकअप केला आहे की, आम्हाला स्वतःलादेखील आरशात पाहून एक मिनीट स्वतःला ओळखता येत नव्हते. सेटवरदेखील सगळ्यांना आम्हाला पाहून आश्चर्याचा धक्का बसला होता.  सगळ्यांनीच आमच्या या लूकची खूप प्रशंसा केली. प्रेक्षकांनादेखील आमचे हे रूप आवडेल अशी मला आशा आहे. " 

Web Title: Why is Gokuldham's change in the series of Tarak Mehta's reverse glasses?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.