"का कुणी गांभीर्याने बघत नाहीये?", मधुराणी प्रभुलकरची अलिबागमधील कुलाबा किल्ल्याबद्दल खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 15:39 IST2024-12-23T15:39:09+5:302024-12-23T15:39:35+5:30

Madhurani Prabhulkar : मधुराणीने अलिबागमधील कुलाबा किल्ल्याला भेट दिली होती. यावेळी तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत खंतदेखील व्यक्त केली.

"Why is no one taking it seriously?", Madhurani Prabhulkar's regret about Colaba Fort in Alibaug | "का कुणी गांभीर्याने बघत नाहीये?", मधुराणी प्रभुलकरची अलिबागमधील कुलाबा किल्ल्याबद्दल खंत

"का कुणी गांभीर्याने बघत नाहीये?", मधुराणी प्रभुलकरची अलिबागमधील कुलाबा किल्ल्याबद्दल खंत

आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) मालिकेनं नुकतंच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. ही मालिका बंद झाली असली तरी या मालिकेतील कलाकार आणि कथानकाने रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील सर्वच कलाकार चर्चेत येत असतात. दरम्यान मधुराणी  प्रभुलकर ( Madhurani Prabhulkar) अलिबागमधील कुलाबा किल्ल्याला भेट दिली होती. यावेळी तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत खंतदेखील व्यक्त केली.

मधुराणी प्रभुलकर हिने इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत लिहिले की, अलिबागला एका कार्यक्रमाच्या निमित्ताने गेले होते तेव्हा तिथल्या किनाऱ्यावरच्या ‘ कुलाबा किल्ल्याला’ भेट दिली आणि अक्षरशः भारावून गेले. किती काय काय आहे तिथे … दगडी भक्कम तटबंदी, त्या काळातल्या तोफा , उजव्या सोंडेच्या गणपतीचं मंदिर, भवानी माता मंदिर , समुद्रात बांधलेल्या हया किल्ल्याच्या मधोमध असणारी गोड्या पाण्याची विहीर … मला अजून माहिती हवी होती ह्या किल्ल्याबद्धल पण ती देऊ शकणारा गाईड सुद्धा तिथे नव्हता. खंत वाटली. किती अप्रतीम महत्वाची ऐतिहासिक पर्यटन स्थळं आहेत आपल्या महाराष्ट्रात पण ह्या कडे का कुणी गांभीर्याने बघत नाहीये?



तिने पुढे म्हटले की, गूगलवर जी माहिती मिळाली ती इथे देतेय. तीस ते पस्तीस किलोमीटर लांबीची अलिबाग तालुक्यातील किनारपट्टी ‘अष्टागर’ या नावाने ओळखली जाते. या अष्टागराचा राजा म्हणजे ‘किल्ले कुलाबा’, अलिबागचा पाणकोट. शिवरायांनी जे जुने किल्ले दुरुस्त करून मजबूत केले त्यापैकी एक ‘किल्ले कुलाबा!’ प्रथम शिवशाहीनंतर पेशवाई आणि सरते शेवटी इंग्रज असे कालखंड ‘किल्ले कुलाब्याने’ पाहिले. इंग्रज ज्यांना ‘समुद्रावरील शिवाजी’ असे संबोधत त्या कान्होजी आंग्रे यांच्या पहिल्या सागरी राजधानीचा मान किल्ले कुलाब्याला मिळाला.

Web Title: "Why is no one taking it seriously?", Madhurani Prabhulkar's regret about Colaba Fort in Alibaug

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.