बिग बॉस मराठी २ : का करतेय शिवानी हीनाला रडवण्याचा प्रयत्न ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 16:28 IST2019-07-18T16:00:33+5:302019-07-18T16:28:54+5:30
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुरु आहे “मर्डर मिस्ट्री” हे साप्ताहिक कार्य. या कार्या दरम्यान खुनी झालेल्या सदस्यांना गुप्तपणे सामान्य माणसाचा सांकेतिक खून करायचा आहे.

बिग बॉस मराठी २ : का करतेय शिवानी हीनाला रडवण्याचा प्रयत्न ?
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुरु आहे “मर्डर मिस्ट्री” हे साप्ताहिक कार्य. या कार्या दरम्यान खुनी झालेल्या सदस्यांना गुप्तपणे सामान्य माणसाचा सांकेतिक खून करायचा आहे. घरातील सदस्यांना शिव आणि शिवानी हे खुनी असल्याचे माहिती नसून घरामध्ये अचानक घडणाऱ्या गोष्टींसाठी सदस्य त्यांचे ज्या सदस्याशी पटत नाही त्यांना दोषी ठरवत आहेत. या टास्कमुळे घरामध्ये धम्माल मस्ती पण सुरु आहे, तर सदस्यांमध्ये भांडण, वाद विवाद देखील सुरु आहेत. आज शिवानीला हीनाचा सांकेतिक खून करायचा आहे. ज्यामध्ये तिला रडवायचे आहे. शिवानीचा सुरु असलेल्या प्रयत्नाने हीना रडण्याऐवजी तिला हसू येत आहे... यामुळे शिवानी गोंधळली आहे आता काय करायचे ? अभिजीत केळकर हे बघून मज्जा घेत आहे.
बघूया या टास्कमध्ये शिवानी हीनाला रडवण्यासाठी काय काय प्रयत्न करेल ? ती यशस्वी ठरेल का? तिकडे आज हीना आणि माधवमध्ये या टास्क दरम्यान वाद होताना दिसणार आहे... तस बघायला गेल तर नेहा, हीना आणि माधवमधील वाद संपायचे नाव घेत नाही..