असा असणार देवमाणूस मालिकेचा शेवट, सोशल मीडियावर रंगलीय चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:43 PM2021-03-19T16:43:26+5:302021-03-19T16:48:17+5:30

देवमाणूस या मालिकेच्या शेवटच्या भागाची  कथा लीक झाली असून या भागात काय होणार याची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे.

this will be end of zee marathi devmanus serial | असा असणार देवमाणूस मालिकेचा शेवट, सोशल मीडियावर रंगलीय चर्चा

असा असणार देवमाणूस मालिकेचा शेवट, सोशल मीडियावर रंगलीय चर्चा

googlenewsNext
ठळक मुद्देसोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चेनुसार डॉक्टरच्या हालचालींवर पोलिसांना संशय येणार असून ते डिम्पलला ताब्यात घेणार आहेत.

झी मराठीवरील देवमाणूस या मालिकेला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला होता. या मालिकेची कथा, या मालिकेतील व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या होत्या. ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ही मालिका संपणार हे कळल्यापासून या मालिकेचा शेवट काय असणार, डॉक्टरला पोलीस कसे पकडणार याची उत्सुकता या मालिकेच्या फॅन्सना लागली आहे.

देवमाणूस या मालिकेच्या शेवटच्या भागाची  कथा लीक झाली असून या भागात काय होणार याची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चेनुसार डॉक्टरच्या हालचालींवर पोलिसांना संशय येणार असून ते डिम्पलला ताब्यात घेणार आहेत. पोलिस डिम्पलला पोलिसी खाक्या दाखवणार आहेत आणि ती डॉक्टरविषयी सगळे काही पोलिसांना सांगून टाकणार आहे. तर दुसरीकडे डॉक्टर मुंबईला पळून जाणार आहे. पण डिम्पलमुळे तो गावात परत येणार असून तो गावात आला आहे याची खबर पोलिसांना मिळणार आहे. त्यामुळे पोलीस त्याच्या मुसक्या आवळणार असून  तो त्याने केलेले सगळे गुन्हे कबूल करणार आहे. 

देवमाणूस या मालिकेत देवमाणसाच्या चेहऱ्याआड लपलेला राक्षसी चेहरा दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. चांगुलपणाचा बुरखा पांघरुन घात करणाऱ्या अशा वृत्तीविषयी भाष्य करणारी देवमाणूस मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. यात मुख्य भूमिकेत 'लागीर झालं जी' मालिकेमुळे प्रकाझोतात आलेला भैय्यासाहेब म्हणजेच किरण गायकवाड झळकला. साताऱ्यामध्ये घडलेल्या एका सत्यघटनेवर आधारित ही मालिका होती. 

Web Title: this will be end of zee marathi devmanus serial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.