'तारक मेहता...' मध्ये लवकरच दिसणार दयाबेन, असित मोदी म्हणाले- "दिशा वकानी..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 10:47 IST2025-04-02T10:46:44+5:302025-04-02T10:47:10+5:30
गेल्या काही वर्षांपासून 'तारक मेहता...'ची टीम नवीन दयाबेनच्या शोधात आहे. मात्र, अद्याप त्यांना दयाबेन मिळालेली नाही. याबाबत आता असित मोदी यांनी प्रतिक्रिया देत मालिकेत लवकरच दयाबेन दिसणार असल्याचं म्हटलं आहे.

'तारक मेहता...' मध्ये लवकरच दिसणार दयाबेन, असित मोदी म्हणाले- "दिशा वकानी..."
'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिकेत दयाबेनची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. गेल्या काही दिवसांपासून दयाबेन मालिकेत पुन्हा परतणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहे. अभिनेत्री काजल पिसल दयाबेनच्या भूमिकेत दिसणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र, अभिनेत्रीने या अफवा असल्याचं सांगितलं होतं. गेल्या काही वर्षांपासून 'तारक मेहता...'ची टीम नवीन दयाबेनच्या शोधात आहे. मात्र, अद्याप त्यांना दयाबेन मिळालेली नाही. याबाबत आता असित मोदी यांनी प्रतिक्रिया देत मालिकेत लवकरच दयाबेन दिसणार असल्याचं म्हटलं आहे.
'तारक मेहता...'मध्ये अभिनेत्री दिशा वकानी दयाबेनची भूमिका साकारत होती. पण, प्रेग्नंन्सीमुळे तिने मालिकेतून ब्रेक घेतला होता. त्यानंतर मालिकेत दयाबेन दिसली नाही. दयाबेन म्हणून परत येण्यासाठी दिशा वकानीला अनेकदा मेकर्सकडून विचारण्यात आलं. मात्र अभिनेत्रीने नकार दिला. आता अखेर मालिकेच्या टीमने दयाबेनला रिप्लेस करण्याचा निर्णय घेतला आहे. "प्रेक्षक दयाबेनची वाट पाहत आहेत आणि लवकरच आम्ही त्या पात्रासाठी कोणाची तरी निवड करू", असं असित मोदी म्हणाले.
"लोकांचं असं म्हणणं आहे की दयाबेनशिवाय 'तारक मेहता...'मध्ये तेवढी मजा येत नाही आणि त्यांच्याशी मी सहमत आहे. एक टीम म्हणून आम्ही दया भाभीची कमी जाणवू न देण्याचा पू्र्ण प्रयत्न करत आहोत. पण, आता लवकरच ती परतणार आहे", असंही असित मोदींनी सांगितलं.
'तारक मेहता...'मध्ये दिशा वकानी पुन्हा परतणार का? यावर असित मोदी म्हणाले,"दिशा वकानी पुन्हा दयाबेनच्या भूमिकेत दिसेल यासाठी आम्ही फक्त प्रार्थना करू शकतो. ती माझ्या बहिणीसारखी आहे आणि तिला काही कौटुंबिक जबाबादाऱ्या सांभाळायच्या आहेत. त्यामुळे तिचं परतणं कठीण आहे. आम्ही आजही तिची आठवण काढतो. तिच्यासारखी दुसरी व्यक्ती भेटावी अशी आशा आहे".