राधिका आणि गुरुनाथ  येणार का एकत्र ?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2018 05:45 AM2018-04-14T05:45:30+5:302018-04-14T14:21:28+5:30

लोकप्रियता आणि टीआरपीचा उच्चांक गाठलेली माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका आणि त्यातील पात्र प्रेक्षकांच्या मानत घर करू न बसली आहेत. ...

Will Radhika and Gurunath come together? | राधिका आणि गुरुनाथ  येणार का एकत्र ?

राधिका आणि गुरुनाथ  येणार का एकत्र ?

googlenewsNext
कप्रियता आणि टीआरपीचा उच्चांक गाठलेली माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका आणि त्यातील पात्र प्रेक्षकांच्या मानत घर करू न बसली आहेत. गोड संसारासाठी थोडं तिखट व्हावं लागतं; असं म्हणत जवळपास वर्षभरापूर्वी सुरु झालेली, माझ्या नवऱ्याची बायको, ही मालिका रसिकप्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः राज्य करतेय. या मालिकेत नुकताच प्रेक्षकांनी राधिकाचा कायापालट पहिला. उद्योजिका बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या राधिकाने पाहता पाहता स्वतःचे  ऑफिस देखील चालू केले. मालिकेत झालेल्या सौमित्र म्हणजेच अद्वैत दादरकरच्या एन्ट्रीने गुरुचीमात्र चांगलीच तारांबळ उडाली आहे.  येत्या रविवारी माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेच्या १ तासाच्या विशेष भागात राधिका तिच्या सहकाऱ्यांसोबत शिर्डीला जाणार  आहेत. गुरु आणि शनाया देखील तिकडे त्यांना धडकणारआहेत. राधिका आणि गुरूला एकत्र आणण्यासाठी सौमित्रने प्लॅन बनवला आहे.  त्याच वेळी राधिका आणि गुरुनाथ ने एका कंपनीत टेंडर भरले आहे, पण कर्म धर्म सहयोगाने हे काम राधिका आणि गुरुनाथच्या कंपनी मध्ये ५० ५०% विभागून मिळाले आहे. आता गुरु आणि राधिका कामात एकमेकांची मदत कितपत घेतील तसेच शिर्डीमध्ये सर्व एकत्र असलेल्या संधीचा फायदा घेऊन सौमित्र राधिका आणि गुरूला एकत्र आणण्याकरिता काय काय युक्त्यालढवतो आणि त्यात तो यशस्वी ठरतो का? हे पाहणे रंजक ठरेल.

 काही दिवसांपूर्वीच मालिकेत राधिकाचा मेक ओव्हर करण्यात आला. आनंद, पानवलकर, जेनी, दामलेकाका, समिधा आणि रेवती या सगळ्यांच्या सोबतीने ती स्वतःची कंपनी सुरु केली. राधिका आता “स्त्री उद्योजिका” म्हणून रसिकांच्या भेटीला आली आहे. आपल्या मुलाकडे अथर्व कडे दुर्लक्ष न करता तिने हा डोलारा उभा केला आहे. 

Web Title: Will Radhika and Gurunath come together?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.