राणा जुळवून घेणार का नव्या मॅनेजरबाईंशी?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2018 12:03 PM2018-08-01T12:03:08+5:302018-08-01T12:14:24+5:30
नुकतंच प्रेक्षकांनी मालिकेतील अनुभवलेला ट्विस्ट म्हणजे राणाला मॅटवरची कुस्ती शिकवायला आलेली नवीन लेडी मॅनेजर.
टीआरपीसोबतच लोकप्रियतेचं शिखर गाठलेल्या 'तुझ्यात जीव रंगला' या झी मराठीवरील रसिक प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकेने नुकतंच ५०० भागांचा टप्पा पार केला. राणादा आणि पाठकबाई यांच्यावरसबंध महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करतात. नुकतंच प्रेक्षकांनी मालिकेतील अनुभवलेला ट्विस्ट म्हणजे राणाला मॅटवरची कुस्ती शिकवायला आलेली नवीन लेडी मॅनेजर. आधीच राणा नंदितावहिनींचा शब्द पाळण्यासाठी त्याच्या मनाविरुद्ध मॅटवरची कुस्ती खेळायला राजी झाला आणि त्यात मुलींपासून ४ हात लांब राहणाऱ्या राणाला मॅटवरची कुस्ती शिकवण्यासाठी एक लेडी मॅनेजर म्हणजेचसखी आल्यामुळे सुरु असलेली त्याची पळापळ प्रेक्षक मालिकेत पाहत आहेत.
मालिकेत इंटरनॅशनल कुस्तीसाठी राणाची तयारी करून घेतली जात आहे. मातीच्या कुस्तीला थोडेदिवस बाजूला सारून राणा सध्या मॅटवरच्या कुस्तीची तयारी करत आहे. पण याकरता आपल्या उस्तादांनाबाजूला करून राणाला मॅनेजर सखीची मदत घ्यावी लागणार आहे आणि राणासाठी हेच सर्वात कठीण काम आहे. यातच गावकऱ्यांना राणाची जी सध्या पळापळ चालू आहे ती मान्य नाही आणि याकरतासगळे गावकरी आपापल्या परीने मॅनेजरबाईंचा निषेध करण्याचा प्रयत्न करत आहे. राणाची बच्चेकंपनी देखील मॅनेजरबाईंना धडा शिकवण्यासाठी उपद्व्याप करते. मॅनेजर सखीने राणाला ३ वेळा कुस्तीतहरवल्याचा राग बच्चेकंपनीला येतो आणि त्याचा बदला घेण्यासाठी ते एक सापळा रचतात पण या त्यांच्या जाळ्यात राणाच अडकतो. तसेच गावकरी मंडळी सखीने राणाची माफी मागावी आणि परत त्याचा अपमान होणार नाही असं काही वागायचं नाही हे तिच्याकडून लेखी मागतात. पण अवधूत म्हणजे सुरजचा मित्र मात्र सखीला बघून अगदी विचित्र बोलतो. आतापर्यंत प्रेक्षकांनी मालिकेत पाहिलं आहे किपाठकबाई राणाला खूप छान समजून घेतात. तसेच पाठकबाईंची प्रत्येक गोष्ट राणा ऐकतो आणि त्यात त्याला यश पण मिळते. तर आता पाठकबाईंच्या सांगण्यावरून राणा मॅनेजर सखीसोबत जुळवूनघेण्याचं ठरवतो. राणा त्याच्या कामात यशस्वी होणार की नंदिता वाहिनी परत मध्येकाही खोडा घालणार? राणा सखी सोबत जुळवून घेण्यात यशस्वी होणार का? हे प्रेक्षकांना येणाऱ्या काही भागात पाहायला मिळेल.