बिग बॉस मराठी सिझन २ : किशोरी, रुपाली आणि वाणीच्या मैत्रीत पडणार फूट?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2019 15:44 IST2019-07-02T15:32:56+5:302019-07-02T15:44:29+5:30
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये या सिझन मध्ये पहिला जो ग्रुप तयार झाला तो होता KVR - किशोरी, रुपाली आणि वीणा. हा ग्रुप प्रेक्षक आणि घरातील सदस्य यामध्ये बराच चर्चेत आहे

बिग बॉस मराठी सिझन २ : किशोरी, रुपाली आणि वाणीच्या मैत्रीत पडणार फूट?
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये या सिझन मध्ये पहिला जो ग्रुप तयार झाला तो होता KVR - किशोरी, रुपाली आणि वीणा. हा ग्रुप प्रेक्षक आणि घरातील सदस्य यामध्ये बराच चर्चेत आहे. त्यांची मैत्री आणि एकमेकांबद्दलच प्रेम आपण सगळ्यानी पाहिलं आहे. पण आता यांच्यामध्ये खटके उडायला सुरुवात झाली आहे. परागच्या अचानक घराबाहेर पडण्याने सगळंच बदललं आहे. या तिघी एकत्र आल्या, तरी देखील किशोरी आणि रुपालीला वीणाचं वागणं खटकत आहे. ग्रुपला ती हवा तेवढा वेळ देत नाही आणि संपूर्ण वेळ शिवबरोबर घालवते असे त्यांचे म्हणणे आहे. इतर सदस्यांसोबत बोलण्यात काहीच वावगं नाही पण किमान एक तास तरी आपल्या ग्रुपला म्हणजेच किशोरी आणि रुपाली यांना द्यावा जेणेकरून स्ट्रॅटरजी आखता येईल असे त्यांचे म्हणणे आहे जे त्यांनी पराग असतानाच ठरवलं होतं. कारण, शिव बरोबर वेळात वेळ काढतो आणि टीमला वेळ देतो असे देखील त्यांनी वीणाला सांगितले.
कालच्या वादानंतर आज देखील वीणा, रुपाली आणि किशोरीमध्ये वाद होणार आहे. वीणचं म्हणणं आहे सकाळपासून मला बरं नाहीये पण कोणीच मला विचारायला आले नाही, रुपाली माझ्याकडे आली देखील नाही. किशोरी यांनी वीणाला समजविण्याचा प्रयत्न केला कि, काल रात्री ठरलं होतं की आपण बोलायचं, रुपाली यावर वीणला म्हणाली, "वीणा तुझ्या वागण्याने आम्ही खूप हर्ट झालो आहे" यावर वीणाने त्यांना सांगितले मग तुम्ही टीम म्हणून खेळा मी एकटी खेळणार. KVR ग्रुपमध्ये खरंच फूट पडणार का ? की त्या एकमेकींना समजून घेतील ? हे पाहणं आता रंजक ठरणार आहे.