​संकेत गावकर बनला ‘झी टीव्ही’वरील ‘डान्स इंडिया डान्स’च्या सहाव्या सिझनचा विजेता

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2018 04:50 AM2018-02-19T04:50:19+5:302018-02-19T10:20:19+5:30

‘डान्स इंडिया डान्स’ या रिअॅ‍लिटी स्पर्धेचा विजेचा कर्नाटकातील अंकोल्याचा संकेत गावकर ठरला असून त्याला झी वाहिनीकडून पाच लाख रुपयांचे ...

Winner of Six Seasons of 'Dance India Dance' on 'Zee TV' became a signal gaoner | ​संकेत गावकर बनला ‘झी टीव्ही’वरील ‘डान्स इंडिया डान्स’च्या सहाव्या सिझनचा विजेता

​संकेत गावकर बनला ‘झी टीव्ही’वरील ‘डान्स इंडिया डान्स’च्या सहाव्या सिझनचा विजेता

googlenewsNext
ान्स इंडिया डान्स’ या रिअॅ‍लिटी स्पर्धेचा विजेचा कर्नाटकातील अंकोल्याचा संकेत गावकर ठरला असून त्याला झी वाहिनीकडून पाच लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले. सचिन शर्मा आणि पियूष गुरभेले या स्पर्धकांची अनुक्रमे पहिला आणि दुसरा उपविजेता म्हणून निवड करण्यात आली आणि या स्पर्धेतील सहभागाबद्दल त्यांनाही रोख पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘डान्स इंडिया डान्स’च्या या अंतिम फेरीत अभिनेत्री चित्रांगदा सिंह उपस्थित होती. ‘झी टीव्ही’वरील ‘डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर्स’ या कार्यक्रमात परीक्षक म्हणून ती टीव्हीवरील कार्यक्रमात लवकरच पदार्पण करणार आहे. या अंतिमफेरीत ‘डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर्स’ या आगामी कार्यक्रमाचा सूत्रसंचालक जय भानुशाली तसेच या कार्यक्रमातील ग्रॅण्डमास्टर मिथुन चक्रवर्ती, मास्टर्स मर्झी, मुदस्सर आणि मिनी तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अमृता खानविलकर आणि साहिल खट्टर हेही उपस्थित होते. या कार्यक्रमाचे विजेतेपद मिळाल्यामुळे आनंदित झालेल्या संकेत गावकरने सांगितले, डान्स इंडिया डान्स या कार्यक्रमामुळे मला खूप काही शिकायला मिळाले. या कार्यक्रमाच्या संपूर्ण टीमने, ग्रॅण्डमास्टर मिथुनदा आणि माझ्या सहस्पर्धकांनी मला नेहमीच सहकार्य केले. या स्पर्धेत मी काहीजणांशी खूप चांगली नाती जोडली असून ते माझे आयुष्यभराचे मित्र बनले आहेत. ‘डान्स इंडिया डान्स’ची ही स्पर्धा मी जिंकली आहे, यावर माझा अजून विश्वास बसत नाहीये. झी टीव्हीने मला माझ्यातील नृत्यकला सादर करण्याची इतकी मोठी संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचा अतिशय आभारी आहे.”
‘डान्स इंडिया डान्स’ स्पर्धेची ही भव्य अंतिम फेरी म्हणजे देशभरातील उत्कृष्ट नर्तकांची मांदियाळीच होती. या विशेष अंतिम फेरीचा प्रारंभ अंतिम फेरीतील स्पर्धकांच्या उत्कृष्ट नृत्यनाट्याने झाला आणि त्यांच्या तिन्ही गुरूंनी मिनी प्रधान, मार्झी पेस्तनजी आणि मुदस्सर खान यांनी देखील आपले नृत्यकौशल्य सादर केले. तसेच सलमान युसुफ खान, मोहेना, सनम, फैझल खान, जीतूमोनी, कॉर्नेल, मिठ्ठू या डान्स इंडिया डान्सच्या या आधीच्या पर्वातील स्पर्धकांनी देखील दिलखेच नृत्य सादर केले. संकेत गावकर, सचिन शर्मा, पियूष गुरभेले, शिवन वानखेडे आणि नैनिका अनसुरे या पाच अंतिम स्पर्धकांनी आपल्या बहारदार नृत्यकौशल्याने उपस्थिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

Also Read : ‘डान्स इंडिया डान्स’मध्ये मिथुनदांनी वाहिली एल्विस प्रिस्लेला श्रध्दांजली!

Web Title: Winner of Six Seasons of 'Dance India Dance' on 'Zee TV' became a signal gaoner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.