ऐतिहासिक क्षणाचे व्हा साक्षीदार…! या मालिकेत पहायला मिळणार भीमराव आणि रमाबाईंचा विवाहसोहळा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2019 01:49 PM2019-08-06T13:49:14+5:302019-08-06T13:52:53+5:30

भीवा १४ वर्षांचा आणि रामी ९ वर्षांची असताना दोघं विवाहबंधनात अडकले होते. हा ऐतिहासिक प्रसंग मालिकेतून अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.

Witness of the historical moment…! Bhimarao and Ramabai weddings will be seen in this series | ऐतिहासिक क्षणाचे व्हा साक्षीदार…! या मालिकेत पहायला मिळणार भीमराव आणि रमाबाईंचा विवाहसोहळा

ऐतिहासिक क्षणाचे व्हा साक्षीदार…! या मालिकेत पहायला मिळणार भीमराव आणि रमाबाईंचा विवाहसोहळा

googlenewsNext

रमाबाई म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग. बाबासाहेबांचं उच्च शिक्षण असो, आंदोलनं असो वा सत्याग्रह रमाबाई त्यांच्यापाठीशी सावलीप्रमाणे उभ्या राहिल्या होत्या. महापुरुषाची सहचारिणी होण्याचं व्रत रमाबाईंनी मोठ्या निष्ठेनं आणि प्रेमाने पाळलं. रमाबाई आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातला हा महत्त्वाचा अध्याय स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या मालिकेत सुरु होतो आहे. याच अध्यायातलं पहिलं पान म्हणजे रामी आणि भीवाचा विवाह. 

भीवाच्या कर्तुत्वाबद्दल रामीला कल्पना असली तरी लग्नापूर्वी दोघांची भेट झाली नव्हती. त्याकाळी तशी प्रथाच नव्हती. त्यामुळे लग्नाच्या दिवशी आपल्या होणाऱ्या पतींना पाहण्यासाठी रामी उत्सुक झाली होती. हे हळवे क्षण मालिकेतून टिपण्यात आले आहेत. अगदी उखाण्यापासून, गृहप्रवेश, नव्या घरात जुळवून घेण्याचा रामीचा प्रयत्न हे भावनिक प्रसंग मालिकेतून पहायला मिळतील. मृण्मयी सुपाळ या मालिकेत बालपणीच्या रमाईंची भूमिका साकारते आहे.

१९०७ साली रमाबाई आणि भीमरावांचा विवाह सोहळा भायखळा येथील मासळी बाजारात पार पडला. तो काळ जसाच्या तसा उभा करण्याचा प्रयत्न ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेच्या संपूर्ण टीमने केलाय. बाबासाहेबांच्या विवाहाप्रसंगी तुफान पाऊस असल्याचा संदर्भ काही पुस्तकांमध्ये आहे.

योगायोग असा की ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या मालिकेत विवाहप्रसंग शूट होत असतानाही मुसळधार पाऊस होता. मात्र संपूर्ण टीमच्या योग्य नियोजनामुळे शूटिंग निर्विघ्नपणे पार पडलं. कलाकारही उत्साहाने या सोहळ्याचा आनंद घेत होते. 


भीवा १४ वर्षांचा आणि रामी ९ वर्षांची असताना दोघं विवाहबंधनात अडकले होते. हा ऐतिहासिक प्रसंग मालिकेतून अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. पुढील संपूर्ण आठवडा रात्री ९ वाजता हे विशेष भाग प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. 

Web Title: Witness of the historical moment…! Bhimarao and Ramabai weddings will be seen in this series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.