'वो' वुमनियाँ.... !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2016 07:17 AM2016-07-05T07:17:35+5:302016-07-05T12:50:42+5:30

छोट्या पडद्यावर पुरुष कलाकारांना आव्हानात्मक आणि तितक्याच ताकदीच्या भूमिका फार अपवादानं मिळतात.. ज्यांच्या वाट्याला तशा भूमिका येतात त्यांना ते ...

'That' womens ....! | 'वो' वुमनियाँ.... !

'वो' वुमनियाँ.... !

googlenewsNext
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">छोट्या पडद्यावर पुरुष कलाकारांना आव्हानात्मक आणि तितक्याच ताकदीच्या भूमिका फार अपवादानं मिळतात.. ज्यांच्या वाट्याला तशा भूमिका येतात त्यांना ते योग्य न्याय देतात. अशा कलाकारांना प्रसिद्धीही मिळतेच.. मात्र असे काही मोजके कलाकार असतात जे आडवाटेवर जाऊन काही तरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतात..टीव्ही जगतातील काही पुरुष कलाकार सध्या स्त्रीपात्र साकारत आहेत त्यांच्या या प्रयत्नांना समीक्षक आणि रसिकांचीही भरभरुन दाद मिळतेय.. पुरुष असताना एखाद्या महिलेचं पात्र साकारणं, महिलेसारखं वागणं, हावभाव, कपडे परिधान करणं सारं काही आव्हानात्मक... मात्र छोट्या पडद्यावरील काही पुरुष कलाकार मात्र हे स्त्री पात्र लीलया साकारतायत.. वुमनिया लूकमध्ये रसिकांचं मनोरंजन करत धुमाकूळ घालणारे  हे पुरुष कलाकार कोण आहेत ते पाहूया....



अली असगर
 
कॉमेडी नाईट्स विथ कपिल या शोमधून अभिनेता अली असगरचं वेगळं रुप रसिकांना अनुभवयाला मिळालं.. या शोमध्ये अली दादीच्या भूमिकेत अवतरला.. त्यानं साकारलेली दादी रसिकांच्या मनात घर करुन गेली.. दादीची धम्माल मस्ती अलीनं मोठ्या खुबीनं साकारली. त्यामुळं द कपिल शर्मा शोमध्येही अलीचा दादी अवतार पुन्हा रसिकांना पाहायला मिळतोय.. 





सुनील ग्रोव्हर
 
छोट्या पडद्यावर अल्पावधीतच सुपरडुपर हिट ठरलेलं स्त्री पात्र म्हणजे गुत्थी.. सुनील ग्रोव्हरनं या गुत्थी या व्यक्तीरेखेला नवं परिमाण मिळवून दिलं.. पुरुष असूनही गुत्थी साकारताना कोणतीही अश्लीलता वाटणार नाही याची काळजी घेत सुनील ग्रोव्हरनं हे पात्र साकारलं.. कॉमेडी नाईट्स विथ कपिल या शोमध्ये गुत्थीच्या नाना त-हा रसिकांना चांगल्याच भावल्या.. दरम्यानच्या काळात कपिलसोबत झालेल्या वादामुळं सुनील ग्रोव्हरनं शोमधून एक्झिट घेतली.. मात्र रसिकांवर गुत्थीची जादू अशी काही झाली होती की तो सुनील ग्रोव्हर पुन्हा एकदा कपिलच्या शोमध्ये गुत्थी बनून अवतरला.. आता नव्याने सुरु झालेल्या द कपिल शर्मा शोमध्येही सुनील ग्रोव्हर रिंकू देवी हे स्त्री पात्र साकारताना पाहायला मिळतोय..


 
किकू शारदा
 
कॉमेडी नाईट्स विथ कपिल शोमध्ये स्त्री पात्र साकारणारा आणखी एक पुरुष कलाकार म्हणजे अभिनेता किकू शारदा.. किकूनं या शोमध्ये साकारलेली पलक रसिकांच्या पसंतीस पात्र ठरलीय.. किकूचा अभिनय आणि कॉमेडी यामुळं पलक हे पात्र अल्पावधीत घरोघरी पोहचलंय.. द कपिल शर्मा शोमध्येही किकू स्त्री पात्र साकारताना पाहायला मिळतोय. कधी नर्सच्या भूमिकेत तर कधी अन्य महिला पात्र तो साकारतोय.. 


विश्वजीत प्रधान
 
अभिनेता विश्वजीत प्रधानला खलनायक साकारणं काही नवं नाही.. मात्र एक बूँद इश्क या मालिकेत विश्वजीतनं महिला पात्राची आव्हानात्मक भूमिका साकारली.. कलावती नावाची भूमिका विश्वजीतनं मोठ्या खुबीनं साकारली. दृष्ट आणि वाईट प्रवृतीच्या कलावतीच्या भूमिकेला त्यानं न्याय दिला
 


 
कृष्णा अभिषेक
 
कॉमेडीयन कृष्णा अभिषेकनं विविध रंगी भूमिका साकारुन रसिकांचं मनोरंजन करण्याचा कायम प्रयत्न केलाय.. प्रत्येक भूमिकेत काही ना काही वेगळं करुन रसिकांना त्यानं हसवलंय.. त्यामुळंच की काय कॉमेडी शोमध्ये तो कधी कधी महिला पात्र साकारतानाही पाहायला मिळाला.. त्यानं साकारलेलं स्त्री पात्र रसिकांना मनमुराद आनंद देऊन गेलं.. 




गौरव गेरा
 
गौरव गेरानं जस्सी जैसी कोई नही या मालिकेत धम्माकेदार एंट्री केली होती,मात्र तो सा-यांच्या लक्षात राहिला चुटकी बनत 'चुटकी  एंड द शॅापकिपर' या वेब सिरीजमुळे. याआधी गौरवनं 'मिसेज पम्मी प्यारेलाल' मध्ये स्त्रीभूमिकाच केली होती.

suvarna.jain@lokmat.com

Web Title: 'That' womens ....!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.