‘सीक्रेट सुपरस्टार’ चित्रपटाचा जागतिक टीव्ही प्रीमिअर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2018 07:43 AM2018-02-20T07:43:36+5:302018-02-20T13:13:36+5:30

2017 मध्ये सर्वाधिक गल्ला जमविलेल्या आणि ‘दंगल’मधील जाहिरा वासिम व आमीर खान यांना एकत्र आणणाऱ्या ‘सीक्रेट सुपरस्टार’ चित्रपटात आपले पार्श्वगायिका ...

World TV premiere of 'Secret Superstar' movie | ‘सीक्रेट सुपरस्टार’ चित्रपटाचा जागतिक टीव्ही प्रीमिअर

‘सीक्रेट सुपरस्टार’ चित्रपटाचा जागतिक टीव्ही प्रीमिअर

googlenewsNext
2017
मध्ये सर्वाधिक गल्ला जमविलेल्या आणि ‘दंगल’मधील जाहिरा वासिम व आमीर खान यांना एकत्र आणणाऱ्या ‘सीक्रेट सुपरस्टार’ चित्रपटात आपले पार्श्वगायिका होण्याचे स्वप्न आणि त्यात कट्टर परंपरावादी आणि तापट स्वभावाचे वडील यांनी आणलेले अडथळे यांच्यावर एका संगीतकाराच्या मदतीने ही तरूण मुलगी कशी मात करते, त्याची थरारक कथा चित्रीत करण्यात आली आहे. या चित्रपटात आमीर खान, जाहिरा वासिम, मेहेर विज आणि राज अर्जुन हे प्रमुख भूमिकांमध्ये आहेत. अद्वैत चंदन यांनी चित्रपटाचे पटकथालेखन आणि दिग्दर्शन केले असून आमीर खान व किरण राव यांनी त्याची निर्मिती केली आहे. अनेक जागतिक विक्रम मोडीत काढलेल्या ‘सीक्रेट सुपरस्टार’ चित्रपटाचा जागतिक टीव्ही प्रीमिअर रविवार, 25 फेब्रुवारी रोजी रात्री 8.00 वाजता ‘ब्लॉकबस्टर चित्रपटांचे अग्रगण्य चॅनल’ असलेल्या ‘झी सिनेमा’ वाहिनीवर प्रसारित होणार आहे. महिलांनी आपली स्वप्ने पाहावीत आणि ती पूर्ण करण्याचाही प्रयत्न करावा, असा प्रेरणादायक संदेश देणाऱ्या या चित्रपटात अनेक कलाकारांनी केलेला अभिनय हा पुरस्कार जिंकण्याच्या तोडीचा आहे. इन्सिया (जाहिरा वासिम) ही कुमारवयीन आणि भावनाप्रधान मुलगी असून तिला मोठेपणी रॉकस्टार व्हायचे आहे. पण तिचे वडील फारूख मलिक(राज अर्जुन) हे कट्टर सनातनी असून त्यांना तिचा हा छंद पसंत नसतो. तिची आई नजमा (मेहेर विज) हिचे आपल्या पतीच्या तापट आणि आक्रमक स्वभावापुढे काही चालत नाही, पण तिचा आपल्या मुलीला मनातून पाठिंबाच असतो. इन्सियाचा एक जिवलग मित्र आणि धाकटा भाऊ हे इन्सियाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बॉलीवूडमध्ये अरेरावी आणि अहंमन्य स्वभावाबद्दल प्रसिध्द असलेल्या एक यशस्वी संगीतकार शक्तीकुमारची (आमीर खान) मदत घेतात. अमित त्रिवेदीचे सुरेल आणि लयदार संगीत ही चित्रपटाची आणखी एक जमेची बाजू आहे. मैं कौन हूँ, प्यारी अम्मी, नचदी फिरा ही गाणी मेघना मिश्रा या बालगायिकेने गायली असूनही ती व्यावसायिक पार्श्वगायिकेइतकी प्रभावी वाटतात. तिचा कोमल आवाज प्रेक्षकांशी भावनिक नाते निर्माण करणारा आहे.या चित्रपटात भूमिका साकारणारी अभिनेत्री मेहेर विज सांगते, “या चित्रपटासाठी चित्रीकरण करीत असताना मला माझे शाळेतील दिवस आठवले. तेव्हा आम्ही मुलं इतकी शिस्तबध्द, अभ्यासू आणि प्रामाणिक होतो! आता अशी शिस्तप्रियता आणि प्रामाणिकपणा आढळणं कठीण असलं, तरी आम्हाला ते दिवस आजही आवडतात. चित्रपटांचा सामान्य माणसाच्या जीवनावर प्रभाव पडतो, असं म्हटलं जातं, ते खरंच आहे. म्हणूनच योग्य संदेश देणारे चित्रपट तयार करणं ही आमची जबाबदारी आहे. हा चित्रपट आपली स्वप्नं साकार करण्यासाठी मुला-मुलींमध्ये चिकाटी उत्पन्न करील,  असं मला वाटतं.” वडोदरामध्ये राहणारी इन्सिया (जाहिरा वासिम) ही 15 वर्षांची शालेय विद्यार्थिनीला गाण्याची अतिशय आवड असते आणि मोठेपणी गायिका होण्याचे तिचे स्वप्न असते. तिचे वडील फारूख मलिक (राज अर्जुन) हे कट्टर सनातनी विचारांचे असून त्यांचा सारा ओढा त्यांच्या मुलाकडे असतो. त्याचे सर्व तऱ्हेचे लाड करताना आपल्या मुलीने घराच्या उंबरठ्याच्या आतच राहिलं पाहिजे, अशी त्यांची भावना असते. तिची आई नजमा (मेहेर विज) ही मात्र आपल्या मुलीला मनातून आणि प्रत्यक्षात जमेल तितका पाठिंबा देत असते. एकदा इन्सिया पूर्ण बुरखा पांघरते आणि एका गाण्याचे चित्रीकरण करून तो व्हिडिओ यू-ट्यूबवर प्रसृत करते. ती सीक्रेट सुपरस्टार असे टोपणनाव घेते. तिचा हा व्हिडिओ गुणी परंतु आपल्या अरेरावी आणि अहंमन्य वागण्याने कुप्रसिध्द झालेला संगीतकार शक्तीकुमारच्या (आमीर खान) पाहण्यात येतो. आपल्या गायिका होण्याच्या स्वप्नपूर्तीत येणारे सर्व अडथळे दूर सारीत आणि शेवटी शक्तीकुमारची मदत घेऊन इन्सिया आपले हे स्वप्न कसे प्रत्यक्षात उतरविते, त्याची ही भावनोत्कट कथा आहे.

Web Title: World TV premiere of 'Secret Superstar' movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.