सुंदरा मनामध्ये भरली ! नऊवारी साडीत खुललं अपूर्वाचं सौंदर्य, भावाच्या लग्नात दिसली इतकी सुंदर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2021 14:34 IST2021-06-22T14:33:49+5:302021-06-22T14:34:14+5:30
अपूर्वा नेमळेकरने शेअर कलेल्या फोटोत मस्तीच्या मुड ती दिसते. भावाच्या लग्नात सगळ्यात उठुन दिसावं यासाठी तिने खास तयारी केली होती.

सुंदरा मनामध्ये भरली ! नऊवारी साडीत खुललं अपूर्वाचं सौंदर्य, भावाच्या लग्नात दिसली इतकी सुंदर
आपले आवडते कलाकारमंडळी शूटिंगशिवाय ऑफस्क्रीन काय काय करतात हे जाणून घेण्यात रसिकांना बरीच उत्सुकता असते. त्यात घरात लग्नसोहळा असेल तर मग त्याची बातच न्यारी असते. लग्नसोहळ्यात प्रत्येकालाच धम्माल मस्ती करायला आवडते. त्याला मराठी कलाकारही अपवाद नाहीत. त्यामुळे
लग्नातील धम्माल काय असते हे प्रत्येकालाच माहिती आहे. हीच धम्माल करण्याची संधी कुणीही सोडत नाहीत.
अभिनेत्री अपुर्वा नेमळेकरनेही लग्नात अशीच काही धम्माल केली आहे.नुकतेच अपूर्वाच्या भावाचं लग्न पार पडलं भावाचं लग्न म्हणजे एक खास सोहळा. त्यामुळे अपूर्वासाठी हे लग्न खूप खास होतं. या लग्नात मजा मस्तीची कोणतीही कसर अपूर्वाने सोडली नव्हती.शेअर कलेल्या फोटोत मस्तीच्या मुड ती दिसते. भावाच्या लग्नात सगळ्यात उठुन दिसावं यासाठी तिने खास तयारी केली होती.
या लग्नात तिने नऊवारी साडी परिधान केली होती. पिळ्या रंगाची नऊवारी साडी, नाकात नथ, कपाळावर टीकली असा साजश्रृंगार केलेला पाहायला मिळत आहे. पारंपरिक अंदाजामध्ये आणखीनच सुंदर दिसत आहे.यासोबत चेहऱ्यावरील स्मित हास्य रसिकांना अक्षरक्षः क्लीन बोल्ड करत आहे. या फोटोवर तिच्या फॅन्सकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे. याआधीही तिने आपल्या सोज्वळ अंदाजाने चाहत्यांना घायाळ केले आहे. अपूर्वाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
कोणत्याही भूमिकेला न्याय देण्याचे कसब अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिच्याकडे आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. नेहमीच तिचा प्रत्येक अंदाज सोशल मीडियावरील फॅन्सना घायाळ करत असतो. सोशल मीडियावर अपूर्वा नेहमीच अॅक्टिव्ह असते. ती आपल्या फॅन्ससोबत नेहमीच वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते. तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत. अपूर्वा आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनाबाबत नेहमीच जास्त सजग असते.