"यार तो मिला अरे प्यार कर ले...", शर्मिष्ठा राऊतने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शेअर केली खास पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 12:58 PM2023-10-11T12:58:55+5:302023-10-11T12:59:26+5:30
Sharmishta Raut : अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तसेच तिने काही महिन्यांपूर्वी निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे.
अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तसेच तिने काही महिन्यांपूर्वी निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे. तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेची निर्मिती तिने केली आहे. शर्मिष्ठाने 'मन उधाण वाऱ्याचे' मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण करत प्रेक्षकांची मने जिंकली. याशिवाय ती सारं काही तिच्यासाठी मालिकेतही पाहायला मिळाली. शर्मिष्ठा सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. दरम्यान तिने नुकतेच नवऱ्यासोबतचा फोटो शेअर करत लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
शर्मिष्ठा राऊतने इंस्टाग्रामवर पती तेजससोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, "यार तो मिला अरे प्यार कर ले"..आज आपल्या लग्नाला ३ वर्ष झाली.. आपल्यात मैत्रीच नात निर्माण झालं होतं आणि आजही ते तसंच टिकून आहे. दिवसेंदिवस आपली मैत्री घट्ट होत जातेय. प्रेम वाढतय...प्रेमात कायम एकमेकांचा हात धरून एकमेकांना aim देऊन, एकमेकांची स्वप्न पूर्ण करू, एकमेकांना समजून घेऊ अस वाटायच थँक्स to swami की त्यांनी मला याच विचारसरणीचा माझ्यावर जीवापाड प्रेम करणारा नवऱ्याच्या रुपातला मित्र दिला..
तिने पुढे म्हटले की, थँक्यू तेजस माझ्या आयुष्यात आलास, मला स्वीकारलंस, माझ्या चिकूचा बाबा झालास, माझ्या माणसांना आपलेसे केलेस हॅप्पी अॅनिव्हर्सरी लव्ह...तेजस देसाई. दरवर्षी मी थँक्यू म्हणेन खर तर रोजच म्हणायला हवे @sups7188 @niranjanpatankar88 @kalpak13 तेजसला माझ्या आयुष्यात आणल्या बद्दल.
शर्मिष्ठा राऊतच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तिने ‘मन उधाण वाऱ्याचे’मध्ये साकारलेली नीरजा ही भूमिका प्रेक्षकांना आवडली होती. झी मराठीवरील ‘जुळून येती रेशीम गाठी’मध्ये तिने अर्चनाची व्यक्तिरेखा साकारली होती. कुंपण ,सप्तपदी, चार दिवस सासूचे, अभिलाषा, एक झुंज वादळाशी या मालिकांमध्ये देखील शर्मिष्ठा झळकली होती. तर तिचा नवरा तेजस हा ‘बोस’ कंपनीत रिजनल सेल्स मॅनेजर आहे. त्याचे चित्रपटसृष्टीशी काहीही नाते नसले तरी कधीकाळी तो फोक डान्सर म्हणून शो करायचा. त्याचे काही मित्रही या क्षेत्रात आहेत. त्यामुळे वेगळे क्षेत्र असून शर्मिष्ठा व त्याला सूर जुळवताना फारशा अडचणी आल्या नाहीत.