खास लोकाग्रहास्तव झी मराठीवरील या मालिकेचे होणार संध्याकाळी होणार पुन्हा प्रक्षेपण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 07:00 AM2023-04-25T07:00:00+5:302023-04-25T07:00:07+5:30
मराठी मालिकांनी प्रेक्षकांना वेड लावलं आहे. मराठी मालिकांचा प्रेक्षकवर्ग वाढतोय.
टीव्हीवरच्या मालिका हा प्रेक्षकांच्या जिव्हाळ्याचा विषय. मराठी मालिकाही घराघरात आवडीने पाहिल्या जातात. वेगवेगळ्या वाहिन्यावर सध्या नव्या नव्या मालिका सुरू होत आहेत. टीआरपीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी नव्या विषयाला वाहिलेल्या मालिका आणण्याची नुसती चढाओढ लागली आहे. झी मराठी ही अशी वाहिनी आहे जी नेहेमी नवनवीन प्रयोग करत असते, झी मराठीवर नेहेमीच वेगवेगळे विषय हाताळले जातात मग ते कौटुंबिक असुदे ऐतिहासिक किंवा मग कॉमेडी. ही वाहिनी आजवर प्रेक्षकांच्या मतांचा नेहेमीच आदर करत आलेय.
झी मराठीवर सुरु झालेली अशीच एक प्रबोधन आणि संस्कार पर मालिका म्हणजे “यशोदा - गोष्ट श्यामच्या आईची” ही मालिका दुपारी १२.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येत होती, आणि या मालिकेने लहान मुलं आणि पालकांच्या मनात घर देखील केलं होत.
ही कथा आहे यशोदाची म्हणजेच एका अश्या आईची आहे जिने साने गुरुजींना घडवलं, ही मालिका आपल्या मुलांवर संस्कार व्हावेत आणि आपली संस्कृती कळावी यासाठी सुरु केली होती, पण मालिकेची दुपारची ही वेळ बदलावी यासाठी अनेक पालकांचे फोन कॉल्स आणि इ मेल्स वाहिनीकडे आले, आणि या सर्वांचा आदर राखत ८ मे पासून ही मालिका प्रेक्षकांना नवीन वेळेत म्हणजे संध्या. ६ वाजता प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या मालिकेची निर्मिती केली आहे पिकोलो फिल्म्स ने (वीरेन प्रधान) यांनी आधी वीरेन प्रधान यांची उंच माझा झोका ही मालिका झी मराठीवर खूप गाजली होती