धक्कादायक! ३१व्या वर्षीच 'ये रिश्ता...' फेम अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका, म्हणाला- "तुम्हाला दारू पिण्याचं..."

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 04:14 PM2024-08-22T16:14:03+5:302024-08-22T16:15:11+5:30

'ये रिश्ता क्या कहलाता है' मध्ये मोहसिनने कार्तिकची भूमिका साकारली होती. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मोहसीनने त्याला हृदयविकाराचा झटका येऊन गेल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे.

ye rishta kya kehlata hai fame actor mohsin khan revealed that he suffered heart attack last year | धक्कादायक! ३१व्या वर्षीच 'ये रिश्ता...' फेम अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका, म्हणाला- "तुम्हाला दारू पिण्याचं..."

धक्कादायक! ३१व्या वर्षीच 'ये रिश्ता...' फेम अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका, म्हणाला- "तुम्हाला दारू पिण्याचं..."

'ये रिश्ता क्या कहलाता है'  ही छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका आहे. गेली कित्येक वर्ष ही मालिका प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत आहे. या मालिकेतूनच अभिनेता मोहसिन खान घराघरात पोहोचला. 'ये रिश्ता क्या कहलाता है' मध्ये त्याने कार्तिकची भूमिका साकारली होती. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मोहसीनने त्याला हृदयविकाराचा झटका येऊन गेल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. 

मोहसिन खानने नुकतीच पिंकविलाला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने गेल्याच वर्षी हृदयविकाराचा झटका आल्याचं सांगितलं. "फॅटी लिव्हरमुळे मला गेल्यावर्षी माइल्ड हृदयविकाराचा झटका येऊन गेला. मी याबद्दल कोणाला सांगितलं नाही. काही दिवस मी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होतो. उपचारानंतर आम्ही २-३ हॉस्पिटलमध्येही दाखवून घेतलं. पण, आता सगळं ठीक आहे. तुम्हाला दारू पिण्याचं सेवन नसेल तरीही तुम्हाला फॅटी लिव्हर असू शकतं. कदाचित आपल्या लाइफस्टाइलमुळे या गोष्टी होत असतील. " असं मोहसिनने सांगितलं. 


मोहसिनने 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकली होती. २०१६ ते २०२१ अशी चार वर्ष त्याने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. या मालिकेतील मोहसिन आणि शिवांगी जोशी हिची जोडी प्रेक्षकांना भावली होती. 

Web Title: ye rishta kya kehlata hai fame actor mohsin khan revealed that he suffered heart attack last year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.