यंदादेखील आदित्य नारायणच करणार सारेगमपचे सूत्रसंचालन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2017 05:57 PM2017-01-03T17:57:26+5:302017-01-04T11:55:53+5:30

​सारेगमप लिटिल चॅम्प्स लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. या कार्यक्रमात हिमेश रेशमिया, नेहा कक्कड आणि जावेद अली परीक्षकांच्या भूमिकेत ...

This year Aditya Narayan made Sarvargap's formula operational | यंदादेखील आदित्य नारायणच करणार सारेगमपचे सूत्रसंचालन

यंदादेखील आदित्य नारायणच करणार सारेगमपचे सूत्रसंचालन

googlenewsNext
ारेगमप लिटिल चॅम्प्स लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. या कार्यक्रमात हिमेश रेशमिया, नेहा कक्कड आणि जावेद अली परीक्षकांच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. या कार्यक्रमाच्या गेल्या अनेक सिझनचे सूत्रसंचालन आदित्य नारायणने केले होते. त्यामुळे यंदा या सिझनचे सूत्रसंचालन कोण करणार याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली आहे. 
यंदादेखील आदित्यच सूत्रसंचालकाची भूमिका साकारणार आहे. सारेगमपचे अनेक वर्षं सूत्रसंचालन करत असल्याने हा कार्यक्रम आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य घटकच बनला आहे असे आदित्य सांगतो. 
सारेगमपने आतापर्यंत अनेक चांगले गायक इंडस्ट्रीला मिळवून दिले आहेत. श्रेया घोषाल, कुणाल गांजावाला, शेखर रावजियानी, बेला शेंडे, संजीवनी, कमाल खान अशा अनेक गायकांच्या करियरची सुरुवात सारेगमपच्या मंचावरूनच झाली आहे. यावर्षीदेखील अनेक चांगले गायक या कार्यक्रमामुळे इंडस्ट्रीला मिळतील अशी या कार्यक्रमाच्या टीमला खात्री आहे.
आदित्य सध्या त्याच्या अल्बममध्ये व्यग्र असला तरी त्याने या कार्यक्रमासाठी वेळ काढलेला आहे. सारेगमप या कार्यक्रमाविषयी आदित्य सांगतो, "सारेगमपसारख्या मंचाशी माझे नाते जोडले गेले असल्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो. या कार्यक्रमाचे गेल्या दहा वर्षांपासून मी सूत्रसंचालन करत आहे. त्यामुळे या मंचावर असताना मला कोणतेही दडपण वाटत नाही. मी माझ्या घरीच वावरत असल्यासारखेच मला वाटते. या कार्यक्रमामुळे मला खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत. या कार्यक्रमाचे चित्रीकरण सुरू व्हायची मी आतुरतेने वाट पाहात आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना स्पर्धकांचे टेन्शन दूर करण्याचा मी नेहमी प्रयत्न करत असतो."  



Web Title: This year Aditya Narayan made Sarvargap's formula operational

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.