'ये रिश्ता क्या कहलाता' फेम चाहत खन्ना ठरली होती डिप्रेशनचा बळी
By गीतांजली | Updated: September 22, 2020 20:27 IST2020-09-22T20:13:26+5:302020-09-22T20:27:46+5:30
सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात असते

'ये रिश्ता क्या कहलाता' फेम चाहत खन्ना ठरली होती डिप्रेशनचा बळी
टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री चाहत खन्ना गायक मिका सिंगसोबतच्या फोटोंमुळे काही महिन्यांपूर्वी चर्चेत आली होती. चाहत सोशल मीडियावर आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. चाहत आणि मिकाचे रोमाँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यावेळी चाहत खान डिप्रेशनची शिकार झाली असल्याची बातमी समोर आली होती.
हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार चाहत म्हणाली, मला डिप्रेशनबाबत आधी माहिती नव्हते. मला जर याची कल्पना असती तर मी यातून बाहेर आलो असते. मला कळलेच नाही की मी कधी डिप्रेशनची शिकार झाले. यातून बाहेर येण्यासाठी मी सतत्याने प्रयत्न करतेय. चाहतने 2006 साली लग्न केले होते, परंतु लग्नाच्या 7 महिन्यांनंतरच ती तिच्या पतीपासून विभक्त झाली. 2013मध्ये तिने पुन्हा लग्न केले. यानंतर तिला दोन मुली झाल्या. 2018मध्ये चाहतने पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आता या दोन्ही मुलींचा संभाळ चाहत सिंगल मदर म्हणून करते आहे.
बडे अच्छे लगते है या मालिकेमुळे चाहता खन्ना चांगलीच नावारूपाला आली. या मालिकेतील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. कबूल है 'कुमकुम: प्यारा सा बंधन', 'तुझ संग प्रीत लगाई सजना' आणि 'हीरो भक्ति की शक्ति है' यांसारख्या मालिकेत झळकली होती. संजय दत्तच्या प्रस्थानम सिनेमात ती झळकली होती.