'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम मोहिना कुमारीच्या घरी आला छोटा पाहुणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 19:25 IST2022-04-16T19:25:26+5:302022-04-16T19:25:55+5:30
Yeh Rishta Kya Kahalata Hai : 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेत कीर्ती गोएंकाच्या भूमिकेत दिसलेली अभिनेत्री मोहिना कुमारी नुकतीच आई बनली आहे.

'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम मोहिना कुमारीच्या घरी आला छोटा पाहुणा
अभिनेत्री मोहिना कुमारी सिंग (Mohena Kumari Singh) आणि तिचा पती सुयश रावत पहिल्यांदाच आई-वडील झाले आहेत. 'ये रिश्ता क्या कहलाता है'मधून मोहिना घराघरात पोहचली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मोहिनाला पुत्र रत्न प्राप्त झाला आहे. मोहिनाने १६ फेब्रुवारी २०२२ ला ती प्रेग्नेंट असल्याचे सांगितले होते. मोहिनाने तिचा पती सुयशसोबतचा एक फोटो पोस्ट केला होता, ज्यामध्ये तिने तिचा बेबी बंप दाखवला होता. कॅप्शनमध्ये त्याने आपल्या नव्या प्रवासाचा उल्लेख करत लिहिले होते की, 'नव्या प्रवासाची सुरुवात केली. सर्वांसोबत चांगली बातमी शेअर करत आहोत.
अभिनेत्री मोहिनाने नुकतेच एका मुलाला जन्म दिला आहे. ही बातमी समोर येताच अभिनेत्रीवर सोशल मीडियावरुन शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मोहिना कुमारी, कॅबिनेट मंत्री आणि अध्यात्मिक गुरू सतपाल महाराज यांचा धाकटा मुलगा सुयश रावतसोबत लग्नबेडीत अडकली आहे. तेव्हापासून ती छोट्या पडद्यापासून दूर होती. पण मोहिना अजूनही सोशल मीडियावर सक्रिय आहे. तिने काही दिवसांपूर्वी व्हर्च्युअल बेबी शॉवर देखील साजरा केला होता. त्याचा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. याशिवाय तिने तिच्या पतीसोबतचे अनेक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचा बेबी बंप स्पष्ट दिसत होता.
मोहिना 'डान्स इंडिया डान्स'मध्ये झळकली होती. यानंतर 'स्टुडंट ऑफ द इयर', 'देढ इश्किया', 'ये जवानी है दिवानी' सारख्या अनेक चित्रपटांसाठी सहाय्यक कोरिओग्राफर म्हणून काम केले आहे. साहजिकच ती एक चांगली अभिनेत्री तर आहेच पण एक चांगली डान्सर देखील आहे.