'या' भूमिकेमुळे शिवांगी जोशी स्वत:ला समजते भाग्यवान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2019 05:03 PM2019-04-08T17:03:58+5:302019-04-08T17:14:10+5:30
‘स्टार प्लस’वरील ‘ये रिश्ता क्या कहलाता है!’ या सर्वाधिक काळ सुरू असलेल्या मालिकेला प्रेक्षक आणि चाहत्यांचे उदंड प्रेम लाभले आहे.
‘स्टार प्लस’वरील ‘ये रिश्ता क्या कहलाता है!’ या सर्वाधिक काळ सुरू असलेल्या मालिकेला प्रेक्षक आणि चाहत्यांचे उदंड प्रेम लाभले आहे. या मालिकेच्या सध्याच्या भागात प्रेक्षकांना पुरूकाका (रुतुराज के. सिंह) हे नायराला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी काय कारस्थान रचताना दिसातेय. शेवटी नायरा त्यांचे खरे स्वरूप सर्वांसमोर उघड करणार आहे. या मालिकेत आपल्याला भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याबद्दल शिवांगी जोशी स्वत:ला केवळ भाग्यवान तर समजते आणि नायराची व्यक्तिरेखा खूपच परिपूर्णतेने रंगविली आहे.
शिवांगी सांगते, “लैंगिक छळवणुकीसारख्या सामाजिक समस्यांना हात घालणाऱ्या ‘ये रिश्ता क्या कहलाता है!’सारख्या मालिकेशी मी संबंधित आहे, याबद्दल मी स्वत:ला सुदैवी समजते. आपल्या असंख्य आणि सर्वदूर पसरलेल्या प्रेक्षक आणि चाहत्यांमार्फत सामाजिक बदलासाठी ही मालिका पुढील पावलं उचलत असते. नायराच्या व्यक्तिमत्त्वातील कणखर आणि आपल्या हक्कांबद्दल जागरूक बाजू पुढे आणणं मला आवश्यक होतं. विशेषत: पुरूकाकांच्या पाशवी कारस्थानानंतर तरी मला आत्मसन्मानानं राहणं गरजेचं होतं. प्रेक्षकांना यातील माझी कामगिरी आवडली असेल, अशी आशा करते.”
या कथानकाच्या प्रसारणानंतर आपल्या समाजात आणि कुटुंबांमध्ये आजही अस्तित्त्वात असलेल्या या समस्येबाबत समाजात चर्चेला तोंड फुटेल, अशी निर्मात्यांची अपेक्षा आहे.