‘ये रिश्ते है प्यार के’मालिकेने रचला नवा इतिहास !
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2019 06:30 AM2019-03-31T06:30:00+5:302019-03-31T06:30:00+5:30
छोट्या पडद्यावर वर्षानुवर्षे मालिकांची भाऊगर्दी झाली आहे. मालिकांमधून रसिकांचं मनोरंजन होतं, एकामागून एक भागातून घराघरात या मालिका लोकप्रिय ठरतात आणि ठराविक काळानंतर या मालिका रसिकांचा निरोप घेतात.
छोट्या पडद्यावर विविध मालिका रसिकांचं मनोरंजन करतात. या मालिकांमधून घराघरात घडणा-या घडमोडी दाखवल्या जातात. त्यामुळे या मालिकांसोबत रसिकांचं वेगळं नातं निर्माण होतं. मालिकेत घडणा-या घडामोडी जणू काही आपल्या आजूबाजूला सुरु आहेत असं रसिकांना वाटतं. त्यामुळे या मालिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरतात. मात्र छोट्या पडद्यावर वर्षानुवर्षे मालिकांची भाऊगर्दी झाली आहे. मालिकांमधून रसिकांचं मनोरंजन होतं, एकामागून एक भागातून घराघरात या मालिका लोकप्रिय ठरतात आणि ठराविक काळानंतर या मालिका रसिकांचा निरोप घेतात. मात्र या मालिकांपैकी अगदी मोजक्या मालिका रसिकांच्या मनावर गारुड घालतात.
अशीच एक मालिका म्हणजे ‘ये रिश्ते है प्यार के’ पहिल्याच दिवसांपासून रसिकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरली आहे. या मालिकेनं अल्पावधीतच रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत एक नवा रेकॉर्ड रचला आहे.छोट्या पडद्यावर 2019 मधील नव्या मालिकांमध्ये ही सर्वाधिक आवडती मालिका ठरली आहे. अबीर ( शाहीर शेख )आणि मिष्टी( र््हिया शर्मा ) यांच्यातील तरल प्रेमाचे नातं, निसर्गरम्य आणि सुंदर स्थळांवर केलेले चित्रीकरण, या दोघांचे कपडे, फॅशन, अस्सल गुजराती संवाद आणि त्यांच्याशी संबंधित सर्वच गोष्टींवर प्रेक्षक फिदा झाले आहेत.
या मालिकेच्या संकल्पनेनेच प्रेक्षकांमध्ये तीव्र उत्सुकता निर्माण केली होती आणि ही मालिका प्रदीर्घ काळ सुरू राहील, याचा अंदाज त्यांनी बांधला होता.या मालिकेला प्रारंभीच लाभलेल्या प्रचंड प्रेक्षकसंख्येमुळे आनंदित झालेल्या र््हिया शर्माने सांगितले, “प्रचंड प्रेक्षकवर्ग लाभलेल्या आणि आपल्या कथानकाद्वारे एक पुरोगामी विचार मांडणार््या या मालिकेचा मी एक हिस्सा आहे, ही गोष्ट माझ्यासाठी अतिशय आनंददायक आणि अभिमानास्पद आहे.
प्रेक्षक आणि चाहत्यंनी या मालिकेला भक्कम पाठिंबा दिल्याचं पाहून मला खूपच आनंद झाला असून ते आमच्या व्यक्तिरेखांवर करीत असलेल्या प्रेमाच्या वर्षावात मी भिजून गेले आहे. याचा अर्थ इतकाच की या मालिकेसाठी आम्ही घेतलेल्या कष्टांचं सार्थक झालं आहे. भारतीय टीव्हीवर ‘ये रिश्ते है प्यार के’ ही मालिका म्हणजे ताज्या वार््याची झुळूक बनली असून तिने प्रेक्षकांच्या मनात आपल्यासाठी एक स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. यामुळे प्रेक्षक यापुढेही ही मालिका नियमितपणे पाहात राहतील, याबद्दल निर्माते आशावादी आहेत.