'मुस्कान'मालिकेतील भूमिकेसाठी येशा रुघानीच करते तिच्या वेशभूषेची निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2018 12:48 PM2018-10-01T12:48:09+5:302018-10-01T12:51:26+5:30
मुस्कान मालिका आता रंजक वळणावर आली आहे. मालिकेतील ट्विस्ट रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. मालिकेत घडणा-या घडामोडी जणू काही आपल्या आजूबाजूला सुरु आहेत असं रसिकांना वाटतं. त्यामुळे ही मालिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे.
मालिकेत आपण कसे दिसतो, याबद्दल काही कलाकार फार दक्ष आणि चोखंदळ असतात. ‘मुस्कान’ मालिकेत मुस्कानचीच भूमिका साकारणारी ऑनस्क्रीन साधी सरळ दिसणारी अभिनेत्री येशा रुघानी ही अशा चोखंदळ कलाकारांपैकी एक आहे. मालिकेत ती मुस्कानच्या आणि डान्स बारमधील नर्तिकेच्या अशा दोन रुपांत दिसते.
मुळात येशा ही गुजराती भाषिक असून येशाला वेस्टर्न ड्रेस परिधान करणे जास्त आवडत नाही. वेशभुषा बाबात ती नेहमीच सजग असून त्यात ती बारकाईने लक्ष देते. त्यामुळे ती तिच्या वेशभूषाकारांना सतत सूचना देत असते आणि आपल्या कपड्यांमध्ये सतत बदल करत असते. तिच्या या सवयीमुळे तिने कपड्यांची चाचणी केल्यावर आता तिचे सर्व कपडे कुलुपबंद करून ठेवले जातात.
मालिकेत येशाला मुजरा पध्दतीचे नृत्य करावे लागत असून त्यासाठी तिला काही प्रमाणात वेस्टर्न पोशाखही घालावा लागतो. पण आपण मालिकेत नेहमी सिंपल लूक असलेले कपडेच वापरू अशी ताकीद तिने दिली आहे. वास्तविक भूमिकेच्या मागणीनुसार अभिनेत्रीला कपड्यांबाबत व्यवहारी भूमिका घेणे उचित ठरते. पण येशाच्या बाबतीत ती गोष्ट शक्य आहे, असे दिसत नाही.
या इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं त्यावेळी फारशी जाण नव्हती. इथलं वातावरण, लोक यांची माहिती नव्हती मात्र काळानुरुप वयानुसार आपल्यात बदल झाले असून चांगलं काय, वाईट काय याची समज आल्याचं तिने सांगितले आहे. आगामी काळात काही तरी वेगळेपण, नाविन्य असेल अशा भूमिका साकारण्याची इच्छा आहे असं तिने म्हटलं आहे.
मुस्कान मालिका आता रंजक वळणावर आली आहे. मालिकेतील ट्विस्ट रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. मालिकेत घडणा-या घडामोडी जणू काही आपल्या आजूबाजूला सुरु आहेत असं रसिकांना वाटतं. त्यामुळे ही मालिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. छोट्या पडद्यावर वर्षानुवर्षे मालिकांची भाऊगर्दी झाली आहे. मालिकांमधून रसिकांचं मनोरंजन होतं, एकामागून एक भागातून घराघरात या मालिका लोकप्रिय ठरतात. त्यापैकीच ही एक मालिका आहे. आता या शोमध्ये असे काही घडणार आहे की ज्यामुळे रसिकांना धक्काच बसेल. ही मालिका फास्ट फॉरवर्ड होऊन तब्बल 14 वर्ष पुढे ढकलली जाणार आहे.