येशा रूघानीने सांगितले तिच्या सौंदर्याचे रहस्य, चाहत्यांना देते खास ब्युटी टीप्स

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 06:35 PM2021-05-27T18:35:46+5:302021-05-27T18:38:42+5:30

'हिरो – गायब मोड ऑन'मध्‍ये स्‍टारलेट झाराची भूमिका साकारणारी येशा ही फॅशनबाबत उत्तम जाण असलेली अभिनेत्री आहे.

Yesha Rughani’s reveals the secret behind chic fashion and shares makeup tips for her fans | येशा रूघानीने सांगितले तिच्या सौंदर्याचे रहस्य, चाहत्यांना देते खास ब्युटी टीप्स

येशा रूघानीने सांगितले तिच्या सौंदर्याचे रहस्य, चाहत्यांना देते खास ब्युटी टीप्स

googlenewsNext

येशा रूघानीची अभिनेत्री म्‍हणून प्रतिभा सर्वांनाच माहितच आहे. टेलिव्हिजनचा सुपरस्‍टार अभिषेक निगमसोबत सर्वोत्तम अभिनय साकारणा-या येशाने तिच्‍या अभिनय व फॅशन कौशल्‍यांसह प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत.सोनी सबवरील मालिका 'हिरो – गायब मोड ऑन'मध्‍ये स्‍टारलेट झाराची भूमिका साकारणारी येशा ही फॅशनबाबत उत्तम जाण असलेली अभिनेत्री आहे. तिने तिच्‍या चाहत्‍यांसाठी, तसेच ग्रूमिंग करण्‍यास उत्‍सुक असलेल्‍या, पण त्‍याची सुरूवात कशी करावी हे माहित नसलेल्‍यांसाठी काही सोप्‍या व आकर्षक फॅशन टिप्‍स सांगितल्‍या आहेत. 

झाराची भूमिका साकारणारी येशा रूघानी म्‍हणाली, ''फॅशन व मेकअप एकमेकांशी निगडित आहेत. फॅशनबाबत जाणून घेण्‍यास उत्‍सुक असलेली कोणतीही व्‍यक्‍ती आपोआपपणे मेकअप ट्रेण्‍ड्सचा संदर्भ पाहते आणि हेच उलट देखील आहे. कम्फर्ट म्हणजेच फॅशन आणि म्‍हणूनच मी आरामदायीपणा देणा-या फॅशन ट्रेण्‍ड्सचा अवलंब करते. मला विंटेज स्‍टाइलची आवड आहे, कारण ती अगदी खास आकर्षक दिसते.

 

मी स्‍टायलिंग शिकले आहे, ज्‍यामुळे मी स्‍कर्ट किंवा स्‍कार्फ खरेदी करताना त्‍याबाबत नेहमीच काळजी घेते. मी विविध कार्यक्रमांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने स्‍टाइल करण्‍याची खात्री घेते. मी नेहमीच आकर्षक शर्ट व पजामाला प्राधान्‍य देते. मी जे काही परिधान करते, त्‍याचा माझ्या मूडवर परिणाम दिसून येतो. झाराच्‍या भूमिकेमुळे माझ्या जीवनात अनेक बदल झाले आहेत. मला तिची स्‍टायलिंग आणि ग्‍लॅमरस मेकअप खूप आवडतो. मी फॅशन व मेकअपच्‍या संदर्भात माझ्या भूमिकेमधून खूप शिकत आहे.''

ती पुढे म्‍हणाली, ''मी मुख्‍यत: माझ्या बहिणींकडून मेकअपसंदर्भात टिप्‍स घेते. त्‍या मला सोप्‍या गोष्‍टींचा सल्‍ला देतात, ज्‍या मी बाहेर जाताना करावयाच्‍या मेकअपसाठी अवलंबू शकते. मी एका सूचनेचे खूप पालन करते, ते म्‍हणजे शेडचा वापर करते, ज्‍यामधून चेह-याला नवीन लुक मिळतो.''

Web Title: Yesha Rughani’s reveals the secret behind chic fashion and shares makeup tips for her fans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.