'येऊ कशी तशी मी नांदायला'मधील मिसेस खानविलकर झालेल्या स्वीटूचा न्यू लूक पाहिलात का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2021 18:24 IST2021-12-21T18:18:16+5:302021-12-21T18:24:51+5:30
झी मराठी वाहिनीवरील 'येऊ कशी तशी मी नांदायला' ( Yeu Kashi Tashi Mi Nandayla)ही मालिकेतच ओम आणि स्वीटूचा विवाह सोहळा पार पडला.

'येऊ कशी तशी मी नांदायला'मधील मिसेस खानविलकर झालेल्या स्वीटूचा न्यू लूक पाहिलात का?
झी मराठी वाहिनीवरील 'येऊ कशी तशी मी नांदायला' ( Yeu Kashi Tashi Mi Nandayla)ही मालिकेतच ओम आणि स्वीटूचा विवाह सोहळा पार पडला. दोघांच्या लग्नासोहळा दरम्यानचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल देखील झाले होते. यानंतर आता स्वीटूचा लग्नानंतरचा पहिला साडीतला फोटोसमोर आला आहे. Mrs. Khanvilkar you see! असे कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे. स्वीटूच्या चाहत्यांना तिचा हा सिंपल साडीतला लूक आवडला आहे.
'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेत स्वीटूची भूमिका अभिनेत्री अन्विता फलटणकर हिने साकारली आहे. अलीकडेचा तिचा वधूच्या गेटअपमधील दोन व्हिडीओ समोर आले आहेत. या व्हिडीओत अन्विता नवरी नटली या गाण्यावर डान्स करताना दिसते आहे. या व्हिडीओत तिने लाल रंगाची साडी, केसात गजरा आणि गॉगल लावलेला पाहायला मिळतोय.
‘टाईमपास’ या सिनेमातील आपली छोटीशी भूमिका प्रेक्षकांना इतकी आवडेल, याची अन्विताला जराही कल्पना नव्हती. पण तिची ही भूमिका चांगलीच गाजली.नंतर ‘गर्ल्स’ या सिनेमातही तिला संधी मिळाली. छबीदार छबी या सुपरहिट गाण्यावर अन्विताने केलेला तुफान डान्स तर सगळ्यांच्याच डोळ्यांत भरला.बीए इन थिएटर या विषयात पदवी पूर्ण केल्यानंतर अन्विता नाटकात काम करत होती. महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातही ती झळकली.