‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेतल्या चिन्याच्या ‘किंजल’ची भावुक पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2022 01:46 PM2022-03-13T13:46:16+5:302022-03-13T13:50:05+5:30
Yeu Kashi Tashi Me Nandayla : ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली. पण आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. नुकताच मालिकेचा शेवटचा भाग शूट झाला आणि शेवटच्या दिवशी सेटवरचे सगळेच कलाकार भावुक झालेत
Yeu Kashi Tashi Me Nandayla Last Episode : स्वीटू आणि ओमची आगळीवेगळी प्रेमकथा अर्थात झी मराठीवरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली. मालिकेतील ओम-स्वीटूची स्वीट लव्हस्टोरी प्रेक्षकांना चांगलीच भावली. पण आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. नुकताच मालिकेचा शेवटचा भाग शूट झाला आणि शेवटच्या दिवशी सेटवरचे सगळेच कलाकार भावुक झालेत. किंजलची भूमिका अभिनेत्री सुवेधा देसाई (Suvedha Desai )ही सुद्धा भावुक झाली. सेटवरील कलाकारांसोबत काही फोटो शेअर करत तिने आता एक भावुक पोस्ट लिहिली आहे.
सुवेधाची पोस्ट...
आणि किंजल निघून गेली... किंजल तू नेहमीच मला भरभरून प्रेम दिले आहेस. तुला निरोप देणे माझ्यासाठी अशक्य आहे. तुम्ही म्हणजेच माझ्या मायबाप प्रेक्षकांनी मला मनापासून प्रेम दिले त्यासाठी मनापासून धन्यवाद. तुमचे प्रेम आणि पाठींबा आहे म्हणून माझ्या मेहनतीला बळ मिळते. असेच कायम माझ्यासोबत राहा. तुम्ही सगळे (मालिकेतील कलाकार)तुमच्या भूमिकेत इतके समरस झाले आहात की सुरूवातीला मला तुमच्यात मिसळून घ्याल की नाही असा प्रश्न पडला होता. पण मी कधी तुमच्यातली एक झाले मला ही कळलं नाही..., असं सुवेधाने लिहिलं आहे.
सुवेधा देसाईने ‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेत किंजलची व्यक्तीरेखा साकारली होती. याशिवाय तिनं ‘वैजू नंबर वन’ मालिकेत दाक्षिणात्य मुलीची भूमिका साकारली होती. ‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेत सुवेधाने किंजलची भूमिका साकारली होती. किंजल ही आशुची गर्लफ्रेंड असते. या मालिकेत ती फारच विनोदी भूमिकेत होती. तिची भूमिका प्रेक्षकांना फारच पसंत पडली होती. शिवाय ही मालिकासुद्धा फारच लोकप्रिय झाली होती. त्यामुळेच या मालिकेचा दुसरा भाग सुद्द्धा आला होता. येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत तिने चिन्याच्या गर्लफे्रन्डची भूमिका साकारली होती.
सुवेधाने लॉकडाऊनमध्ये सागर गावकर याच्यासोबत लग्नगाठ बांधली होती. सागर हा लेखक- दिग्दर्शक असून त्याने सुवासिनी मालिकेचं दिग्दर्शन केलं आहे.