'येऊ कशी तशी मी नांदायला' घेणार प्रेक्षकांचा निरोप, स्वीटू झाली भावूक; म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2022 11:27 AM2022-02-19T11:27:51+5:302022-02-19T11:36:54+5:30

'येऊ कशी तशी मी नांदायला' (Yeu Kashi Tashi Mi Nandayla)मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

Yeu Kashi Tashi Me Nandayla serial will goes off air very soon, sweetu become emotional | 'येऊ कशी तशी मी नांदायला' घेणार प्रेक्षकांचा निरोप, स्वीटू झाली भावूक; म्हणाली...

'येऊ कशी तशी मी नांदायला' घेणार प्रेक्षकांचा निरोप, स्वीटू झाली भावूक; म्हणाली...

googlenewsNext

'येऊ कशी तशी मी नांदायला' (Yeu Kashi Tashi Mi Nandayla) मालिकेने कमी कालावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली. मालिकेत दाखवण्यात आलेली एक आगळी वेगळी कहाणी प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. स्वीटू आणि ओमची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावली. मालविकाने अनेक अडथळे आणल्यानंतरही ओम आणि स्वीटू यांचे लग्न झालेले पाहून प्रेक्षक सुखावले होते. आता स्वीटू ओमच्या बाळाची आई होणार आहे.  ही मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे आणि त्याजागी स्वप्निल जोशी आणि शिल्पा तुळसकर यांची नवी मालिका तु तेव्हा तशी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

येऊ कशी तशी मी नांदायला मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार म्हणून यात स्वीटूची भूमिका साकारणारी अभिनेत्री अन्विता फलटणकर भावूक झाली. तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर सेटवरचा शेवटचा फोटो शेअर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. स्वीटू या फोटोत खिडकीच्या बाहेर बघताना दिसतेय. साळवींच्या घराची आठवण मला आधीच  येते!

प्रेक्षकांनी अन्विताने साकारलेल्या स्वीटू या भूमिकेला भरभरुन प्रेम दिलं. आज अन्विताचा खूप मोठा चाहता वर्ग असल्याचं पाहायला मिळतं.स्वीटूने याआधीही मराठी सिनेमांमध्ये काम केलं आहे.

रवी जाधव दिग्दर्शिक 'टाईमपास'मध्ये केतकी माटेगावकरच्या मैत्रिणीची भूमिका अन्विताने साकारली होती. यानंतर 2019मध्ये आलेल्या गर्ल्स या सिनेमात अन्वितान 'रुमी'च्या भूमिकेत झळकली होती. Why so गंभीर या नाटकातही तिने काम केलं आहे.मात्र, येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेच्या माध्यमातून ती खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली.
 

Web Title: Yeu Kashi Tashi Me Nandayla serial will goes off air very soon, sweetu become emotional

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.