'संतापजनक..!', 'येऊ कशी तशी मी नांदायला'मधील स्वीटूला उबर कॅबचा आला वाईट अनुभव, व्यक्त केली नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 03:14 PM2021-10-14T15:14:22+5:302021-10-14T15:14:49+5:30
स्वीटू उर्फ अन्विता फलटणकर हिने नुकतेच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री अन्विता फलटणकर 'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेमुळे खूप चर्चेत आली आहे. या मालिकेत तिने साकारलेली स्वीटू प्रेक्षकांच्या पसंतीस पात्र ठरली आहे. अन्विता सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे आणि ती या माध्यमातून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. इतकेच नाही तर ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. नुकतेच तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे.
स्वीटू उर्फ अन्विता फलटणकर हिने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. तिने ही पोस्ट शेअर करत संतापजनक असे कॅप्शन दिले आहे. तसेच या पोस्टमध्ये तिने उबर इंडिया, उबर ड्रायव्हरला टॅग केले आहे. या पोस्टमध्ये तिने म्हटले की, उबर इंडिया तुमची सेवा खूपच संतापजनक आहे. मी तुमच्या सेवेसोबत निराश झाले आहे. सकाळी ७.१५ वाजता कॅब बुक करण्यासाठी प्रयत्न करत होते. मी ४ वेळा कॅब बुक केली आणि ३ वेळा ती कॅब ८ मिनिटांनंतर कॅन्सल होत होती. प्रत्येक कॅबमागे माझी ८ मिनिटे वाया गेली.
ती पुढे म्हणाली की, अखेर मला कॅब मिळाली आणि मी निघाले. पुढच्या ७ मिनिटांत कंपनीने कॅब कॅन्सल केली आणि मला कॅबमधून उतरवले. हे अत्यंत निराशाजनक आहे. अन्विताला उबेर इंडिया या कॅब सर्व्हिसचा खूप वाईट अनुभव आला आहे. तिच्या या पोस्टवर तिचे चाहते नाराजी व्यक्त करत आहेत. एका युजरने या पोस्टवर म्हटले की, उबर इंडिया हे बेजबाबदार वागणूक होती. दुसऱ्या युजरने म्हटले की, सकाळ खराब केली. आणखी एका युजरने म्हटले की, खरंच हे खूप संतापजनक आहे आणि माझ्यासोबतही असे झाले आहे. उबर इंडियाची सेवा समाधानकारक नाही.