' येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेतल्या मोहितला नेगिटीव्ह भूमिका करण पडतंय महागात म्हणाला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2021 04:59 PM2021-09-06T16:59:37+5:302021-09-06T17:05:55+5:30
'येऊ कशी तशी नांदायला' मालिकेत ओम आणि स्विटूचे लग्न न होता मोहितसोबत लावून देण्यात आलं. खरं तर हा ट्विस्ट पाहूनच रसिकांचा हिरमोड झाला होता.
'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिका सुरुवातीपासूनच रसिकांची आवडती मालिका बनली होती. रंजक वळणांमुळे रसिकही मालिकेला खिळून होते. मालिकेची कथा कलाकारांचा दमदार अभिनय यामुळे कलाकाराही रसिकांचे तितकेच आवडते बनले होते. या मालिकेमुळे कलाकार घराघारात लोकप्रिय झाले. पण गेल्या काही दिवासांपासून मालिका अतिरंजक करण्याच्या नादात वेगळ्याच वळणावर जात आहे. एरव्ही रसिकांची भरपूर पसंती मिळणाऱ्या या मालिकेवर आता रसिकही नाराजी व्यक्त करु लागले आहे.
मुळात न पटणारी कथा दाखवून रसिकांचे मनोरंजनाच्या नावाखाली भलतंच दाखवलं जात असल्याची टीका आता रसिकही करु लागले आहेत. मालिकेत ओम, स्विटू, मालविका, नलू मावशीप्रमाणे मोहितच्या भूमिकेलाही रसिकांची पसंती मिळत होती. मात्र आता प्रचंड प्रमाणात निखिल राऊतला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
मालिकेत ओम आणि स्विटूचे लग्न न होता मोहितसोबत लावून देण्यात आलं. खरं तर हा ट्विस्ट पाहूनच रसिकांचा हिरमोड झाला होता. हा एपिसोड पाहून चाहत्यांनी चांगलीच नाराजी व्यक्त केली होती. मोहित आणि स्विटू दोघेही लग्नानंतर ओमच्याच घरी राहायला गेले आहेत. मालिकेतल्या या सगळ्या गोष्टी पाहून रसिकांनी नाराजी व्यक्त करत मोहित साकारत असलेला अभिनेता निखिल राऊतवरच निशाणा साधला आहे. त्याला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहे. त्याच्या या भूमिकेमुळे त्याच्या खासगी आयुष्यावरच नेटीझन्स नको नको ते बोलत ट्रोल करत आहे. हे सगळं पाहून निखिल राऊतनेही ट्रोल करणाऱ्यांना सभ्य शब्दात उत्तर दिले आहे.
ट्रोलिंगला कंटाळून निखिल राऊतही पहिल्यांदाच मौन सोडले आहे.मुळात निगेटीव्ह भूमिका साकारताना रसिकांच्या रागाला सामोरे जावे लागणार याची कल्पना होतीच. व्यावसायिक आयुष्यापर्यंत सगळं काही ठिक आहे. भूमिकेबद्दल रसिकांचा राग साहजिक आहे. त्याबद्दल तक्रार नाही. पण खासगी आयुष्यावरही बोलले जावे हे योग्य नाही. ट्रोलिंगचा तसाही फारसा फरक पडत नाही. पण मर्यादेपलिकडचे ट्रोलिंग अजिबात सहन करणार नसल्याचे म्हणत त्याने चाहत्यांना भावनिक आवाहन केले आहे.