आईच्या कडेवर असलेल्या या चिमुकलीला ओळखलंत का, आज ती आहे प्रसिद्ध मराठी मालिकेतील अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 12:20 PM2021-05-22T12:20:11+5:302021-05-22T12:25:42+5:30
चार वर्षांची असताना तिने भरतनाट्यमचं प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली होती.
झी मराठीवरील 'येऊ कशी तशी मी नांदायला' ही मालिका फार गाजते आहे. या मालिकेतील ओम आणि स्वीटूमधील केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली आहे. मालिकेतील नायिका स्वीटूची भूमिका साकारत असलेल्या अन्विता फलटणकरने आपल्या निरागस आणि सोज्वळतेने सगळ्यांचं लक्षं आपल्याकडे वेधून घेतलं आहे.
अन्विता फलटणकर सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती फॅन्सच्या संपर्कात असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती शेअर करत असते आणि त्यांना चाहत्यांची देखील पसंती मिळते. अन्विताने काही दिवसांपूर्वी तिच्या लहानपणीचा आईसोबतचा फोटो शेअर केला आहे. चाहत्यांनी अन्विताच्या या क्युट फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
अन्विताच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलवर नजर टाकली तर लक्षात येतं खऱ्या आयुष्यात स्वीटू खूपच स्टायलिश आहे. अन्विताने याआधीही मराठी सिनेमांमध्ये काम केलं आहे. रवी जाधव दिग्दर्शिक 'टाईमपास'मध्ये केतकी माटेगावकरच्या मैत्रिणीची भूमिका अन्विताने साकारली होती. यानंतर 2019मध्ये आलेल्या गर्ल्स या सिनेमात अन्वितान 'रुमी'च्या भूमिकेत झळकली होती. Why so गंभीर या नाटकातही तिने काम केलं आहे. अन्विताने चार वर्षांची असताना भरतनाट्यमचं प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली होती. ‘चतुर चौकडी’ आणि 'रुंजी' या मालिकेतही तिने काम केलं.