बिग बॉसमध्ये योगिता चव्हाणच्या डोळ्यात पाणी, पॅडी कांबळेंनी अभिनेत्रीच्या घरच्यांना केलं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 11:09 AM2024-07-31T11:09:05+5:302024-07-31T11:11:41+5:30

योगिता चव्हाण बिग बॉसच्या घरात भावुक झालेली दिसली. त्यामुळे घरातील सदस्य तिला शांत करताना दिसले (Bigg Boss Marathi 5)

Yogita Chavan emotional in the Bigg Boss marathi 5 house paddy kamble appeal to actress family | बिग बॉसमध्ये योगिता चव्हाणच्या डोळ्यात पाणी, पॅडी कांबळेंनी अभिनेत्रीच्या घरच्यांना केलं आवाहन

बिग बॉसमध्ये योगिता चव्हाणच्या डोळ्यात पाणी, पॅडी कांबळेंनी अभिनेत्रीच्या घरच्यांना केलं आवाहन

'जीव माझा गुंतला' फेम अभिनेत्री योगिता चव्हाण 'बिग बॉस मराठी'च्या नवीन सीझनमध्ये सहभागी झालीय. योगिताने अभिनेत्री जान्हवी किल्लेकरसोबत 'बिग बॉस मराठी'च्या नवीन सीझनमध्ये एन्ट्री केली. योगिता घरात अजूनतरी शांतपणे सर्व कामं करत आहे. ती कोणत्याही वादविवादात पडली नाहीय. पण नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये योगिताच्या डोळ्यात पाणी आलेलं दिसलं. त्यामुळे इतर सदस्य तिची समजूत काढताना दिसले.

म्हणून योगिताच्या डोळ्यात पाणी

बिग बॉस मराठीच्या कालच्या भागात पाहिलं की सर्व सदस्य गार्डन एरियात गप्पा मारत बसले असतात. पुढे योगिता बेडरुमच्या इथे येते. तिथे ती आर्या जाधवला मिठी मारून रडताना दिसते. घरातील सदस्य तिला शांत करताना दिसतात. पती सौरभ चव्हाण आणि घरच्यांच्या आठवणीत योगिताच्या डोळ्यात पाणी येतं. "बिग बॉसच्या घरात रडण्याचा पहिला मान मिळालेला आहे योगिता चव्हाण यांना", असं अंकिता वालावलकर म्हणताना दिसते. 


पॅडीने योगिताच्या पतीला केलं हे आवाहन

पुढे योगिताला शांत करण्यासाठी पॅडी उर्फ पंढरीनाथ कांबळेने ऑन कॅमेरा योगिताच्या पतीला आवाहन केलं. पॅडी म्हणाला, "तुझी बायको खूप स्ट्रॉंग आहे. आम्ही जनरल जे काय बोलतो त्याचा विचार करु नकोस. तुझी बायको खूप स्ट्रॉंग आहे काळजी करु नकोस." योगिता चव्हाणचा पती सौरभ चव्हाणही मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. सौरभ आणि योगिता दोघांनी 'जीव माझा गुंतला' या मालिकेत एकत्र काम केलं होतं.

 

Web Title: Yogita Chavan emotional in the Bigg Boss marathi 5 house paddy kamble appeal to actress family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.