योगिता चव्हाण भिडली, थेट निक्कीला नडली! बिग बॉस मराठीचा प्रोमो बघून तुम्हीही व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 05:33 PM2024-08-16T17:33:33+5:302024-08-16T17:34:05+5:30

योगिता चव्हाणचं नवं रुप बिग बॉस मराठीच्या घरात पाहायला मिळतंय. यामुळे घरातल्या सर्वच जणांना आश्चर्याचा धक्का बसलाय (yogita chavan, bigg boss marathi 5)

yogita chavan fight with nikki tamboli new promo of bigg boss marathi 5 | योगिता चव्हाण भिडली, थेट निक्कीला नडली! बिग बॉस मराठीचा प्रोमो बघून तुम्हीही व्हाल थक्क

योगिता चव्हाण भिडली, थेट निक्कीला नडली! बिग बॉस मराठीचा प्रोमो बघून तुम्हीही व्हाल थक्क

बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनचा प्रोमो रिलीज झालाय. या प्रोमो पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. गेले काही दिवस बिग बॉसला घराबाहेर जाणारी मागणी करणारी योगिता आता मात्र शांत बसणार नाही असं दिसतंय. बिग बॉस मराठीचा नवीन प्रोमो रिलीज झालाय. या प्रोमोत कॅप्टनसीसाठी योगिता निक्की तांबोळीला चांगलंच आव्हान देताना दिसणार आहे. आजवर कधीही न पाहिलेलं योगिताचं रुप पाहायला मिळतंय. 

कॅप्टनसीसाठी योगिता-निक्कीमध्ये चढाओढ

बिग बॉसच्या घरात कोणत्याही टास्कमध्ये सदस्यांमध्ये चांगलीच चढाओढ पाहायला मिळते. आजच्या भागाच्या कॅप्टनसी टास्कदरम्यानचा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये निक्की आणि योगिता आमने-सामने येऊन टास्कमध्ये टक्कर देताना दिसत आहेत. योगिताला बाहेर काढण्यासाठी निक्की - जान्हवी प्रयत्न करताना दिसणार आहेत.  पण योगिता निक्की-जान्हवीचा चांगलाच प्रतिकार करताना दिसणार आहे.


कोण होणार घराचा नवीन कॅप्टन

 आजच्या भागात टीम B मधील सदस्य गार्डन एरियामध्ये गेम प्लॅनबद्दल भाष्य करताना दिसणार आहेत. 'बिग बॉस मराठी'चा आजचा कॅप्टनसी टास्क खूपच रंगतदार असणार आहे. कोण होणार 'बिग बॉस मराठी'चा नवा कॅप्टन याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. योगिता, अरबाज, निक्की, जान्हवी, सूरज यांपैकी कोण घराचा नवीन कॅप्टन होणार हे आजच्या भागांमध्ये पाहायला मिळेल. दरम्यान योगिताचं हे नवं रुप तिच्या चाहत्यांना सुखावणारं असेल यात शंका नाही.
 

Web Title: yogita chavan fight with nikki tamboli new promo of bigg boss marathi 5

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.