‘लग्नाची वाईफ वेडिंगची बायकू’ मालिकेतील विदेशी मारियाचा असा अंदाज तुम्ही पाहिला का? ख-या आयुष्यातील फोटो होतात व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2020 06:00 IST2020-07-21T06:00:00+5:302020-07-21T06:00:02+5:30
अभिनेत्री लियाना आनंदने फॉरेनरप्रमाणे दिसावी यासाठी तिच्या लूकवर बरीच मेहनत घेण्यात आली आहे.या भूमिकासा साजेसे खास ब्रिटीश भाषेचा अॅक्सेंटही शिकून घेतला आहे.

‘लग्नाची वाईफ वेडिंगची बायकू’ मालिकेतील विदेशी मारियाचा असा अंदाज तुम्ही पाहिला का? ख-या आयुष्यातील फोटो होतात व्हायरल
छोट्या पडद्यावरील लग्नाची वाईफ वेडिंगची बायको या मालिकेनं अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. मालिकेतील विदेश डॉलची सगळीकडे चर्चा रंगली होती. ही अभिनेत्री नक्की आहे तरी कोणं? असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. ही सौंदर्यवती मुळात भारतीय असून मालिकेत तिला एक वेगळा लूक दिला गेला आहे. तिच्या केसांचा रंग बदलला गेला आहे. लियाना आनंद असे तिचे नाव आहे. फॉरेनरप्रमाणे दिसावी यासाठी तिच्या लूकवर बरीच मेहनत घेण्यात आली आहे.या भूमिकासा साजेसे खास ब्रिटीश भाषेचा अॅक्सेंटही शिकून घेतला आहे.
तिने आपला ग्लॅमरस अंदाज आणि बोलण्यातील विदेशी लकबीमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते .तिला या भूमिकेसाठी खास प्रशिक्षणही देण्यात आलंय. तिच्या खासगी आयुष्यात सुद्धा ती फारच फॅशनेबल आहे. ती इन्स्टाग्रामवर तिचे ग्लॅमरस फोटो पोस्ट करत असते. लियानाची ही पहिलीच मालिका आहे. अल्पावधीतच तिने सा-यांची मनं जिंकली आहेत. इतर भूमकांप्रमाणे या भूमिकेचीही रसिक भरभरून कौतुक करतात.
सोशल मीडियावर तिच्या फोटोंवर रसिकांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत असतो. प्रत्येक स्टाइल तिच्या सौंदर्याला चारचाँद लावते. तिचा प्रत्येक अंदाज रसिकांच्या पसंतीस उतरतो.विशेष म्हणजे लूकबाबत काही ना काही प्रयोग करत असते. त्यामुळे जर एखादी व्यक्तीरेखा साकारायची असेल तर विविध गोष्टी मला माहित असणं गरजेचं असते. त्यानुसार मेहनत करत असल्याचे तिने एका दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते.