‘रात्रीस खेळ चाले २’ मध्ये शेवंताचं हे रुप बघून तुम्हालाही बसेल धक्का!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 07:15 AM2019-08-28T07:15:00+5:302019-08-28T07:15:00+5:30
झी मराठी वरील ‘रात्रीस खेळ चाले २’ या मालिकेने अल्पावधीतच लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. 'रात्रीस खेळ चाले २', मधील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष दाद मिळत आहे.
झी मराठी वरील ‘रात्रीस खेळ चाले २’ या मालिकेने अल्पावधीतच लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. मालिकेच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांनी जसा भरभरून प्रतिसाद दिला तसंच या २ भागावर देखील प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. याचं बहुतांश श्रेय हे मालिकेतील कलाकारांनाही जातं. मुख्य म्हणजे 'रात्रीस खेळ चाले २', मधील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष दाद मिळत आहे.
या मालिकेत जेव्हापासून शेवंताची एंट्री झाली आहे तेव्हापासून मालिकेची लोकप्रियता आणखी वाढली आहे. अपूर्वा नेमळेकर या मालिकेत शेवंताची व्यक्तिरेखा साकारत आहे आणि पाहता पाहता या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे.
सगळ्या वयोगटांमध्ये आज शेवंताची चर्चा आहे. सध्या मालिकेत प्रेक्षकांनी पाहिलं कि शेवंताला दिवस गेले त्यामुळे अण्णा शेवंताला एक औषध देतात. ते औषध घेतल्यानंतर तिची तब्येत जरा नाजूक आहे. अण्णा हे शेवंताची अदा आणि तिच्या मनमोहक रूपावर भाळले. पण अण्णांनी दिलेलं औषध घेतल्यानंतर शेवंताच्या याच मनमोहक रूपाचं बेरूप झालं आहे. सुंदर दिसणारी, रूपवती शेवंता जिला तिच्या सौंदर्याचा गर्व होता ती आता तिचा चेहरा आरशात पाहायला देखील धजावत नाही आहे. अण्णा जेव्हा शेवंताचं हे रूप बघतील तेव्हा त्यांची काय प्रतिक्रिया असेल हे प्रेक्षकांच्या आगामी भागात पाहायला मिळेल.