धनश्रीसोबत घटस्फोटाच्या सुनावणीआधी RJ महावशसोबत दिसला युजवेंद्र चहल, फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 15:27 IST2025-03-20T15:26:37+5:302025-03-20T15:27:15+5:30
Yuzvendra Chahal Spotted with RJ Mahavash: लग्नानंतर ४ वर्षांतच धनश्री आणि चहलचा संसार मोडला आहे. धनश्रीसोबत घटस्फोटाच्या सुनावणीआधी चहलला पुन्हा एकदा RJ महावशसोबत स्पॉट करण्यात आलं. याचे फोटो समोर आले आहेत.

धनश्रीसोबत घटस्फोटाच्या सुनावणीआधी RJ महावशसोबत दिसला युजवेंद्र चहल, फोटो व्हायरल
भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहलच्या वैवाहिक आयुष्यात वादळ आलं आहे. युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माच्या घटस्फोटाच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. अखेर आज घटस्फोट घेत ते वेगळे झाले. लग्नानंतर ४ वर्षांतच धनश्री आणि चहलचा संसार मोडला आहे. धनश्रीसोबत घटस्फोटाच्या सुनावणीआधी चहलला पुन्हा एकदा RJ महावशसोबत स्पॉट करण्यात आलं. याचे फोटो समोर आले आहेत.
इन्स्टंट बॉलिवूडच्या इन्स्टाग्राम पेजवरुन चहल आणि RJ महावशचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. या फोटोंमध्ये घटस्फोटाच्या सुनावणीआधी चहल RJ महावशसोबत दिसल्याचा दावा करण्यात आला आहे. चहल आणि RJ महावशला अंधेरीतील एका पार्कमध्ये स्पॉट करण्यात आलं. यावेळी चहलने चेहऱ्यावर मास्क आणि डोळ्यावर गॉगल लावला होता. चहल आणि RJ महावशचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
दरम्यान, गेल्या अडीच वर्षांपासूनच वेगळे राहत असल्याचं चहल आणि धनश्रीने कोर्टात सांगितलं आहे. कौटुंबिक न्यायालयाने चहल-धनश्रीच्या घटस्फोटाचा अर्ज फेटाळल्यानंतर त्या दोघांनी याचिकेत हा खुलासा केला. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करत सहा महिन्यांचा 'कुलिंग ऑफ पिरेड' रद्द करण्याचे निर्देश देत तातडीने यावर सुनावणी करण्यास सांगितले. तसेच चहलच्या IPL सहभागाचा विचार करता, या जोडप्याच्या घटस्फोटाबाबत गुरुवारपर्यंत अंतिम निर्णय घेऊन त्याला 'घटस्फोटाचा जाहीरनामा' ( Divorce Decree ) दिला जावा असेही सांगण्यात आले होते. त्यानुसार, आज चहल आणि धनश्रीचा घटस्फोट झाल्याची माहिती त्यांच्या वकिलाने दिली आहे.
युजवेंद्र चहलकडून धनश्री वर्माला मिळणार ₹४.७५ कोटी, पाहा कोणते आहेत जगातील सर्वात महागडे घटस्फोट?
किती रुपये पोटगी दिली जाणार?
युजवेंद्र चहल याने घटस्फोटाच्या अर्जाच्यावेळीच ४ कोटी ७५ लाखांची पोटगी देण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले होते. मिळालेल्या माहितीनुसार, ४.७५ कोटींच्या एकूण पोटगीपैकी २.३७ कोटींची पोटगी आधीच धनश्रीला ट्रान्सफर करून झाली असल्याचे म्हटले आहे. तर उर्वरित पोटगीची रक्कम घटस्फोटाचा जाहीरनामा मिळाल्यानंतर देण्याची तजवीज समुपदेशकाच्या मध्यस्थी करण्यात दिली.