'अल्लादिन: नाम तो सुना होगा'मध्ये झफरला सापडला अंगठीतला जीनी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2019 07:15 AM2019-02-10T07:15:00+5:302019-02-10T07:15:00+5:30

सोनी सबच्या 'अल्लादिन : नाम नो सुना होगा या मालिकेने आपल्या सातत्याने उत्कंठा वाढवणाऱ्या पटकथेमुळे प्रेक्षकांना अगदी टीव्हीसमोर खिळवून ठेवले आहे.

Zafar acquires Genie of the Ring in Sony SAB’s Aladdin: Naam Toh Suna Hoga | 'अल्लादिन: नाम तो सुना होगा'मध्ये झफरला सापडला अंगठीतला जीनी

'अल्लादिन: नाम तो सुना होगा'मध्ये झफरला सापडला अंगठीतला जीनी

googlenewsNext
ठळक मुद्दे बगदादच्या लोकांच्या सुरक्षेसाठी अल्लादिन आणि यास्मिन शर्थीचे प्रयत्न करत आहेत.


सोनी सबच्या 'अल्लादिन : नाम नो सुना होगा या मालिकेने आपल्या सातत्याने उत्कंठा वाढवणाऱ्या पटकथेमुळे प्रेक्षकांना अगदी टीव्हीसमोर खिळवून ठेवले आहे. बगदादच्या लोकांच्या सुरक्षेसाठी अल्लादिन (सिद्धार्थ निगम) आणि यास्मिन (अवनीत कौर) शर्थीचे प्रयत्न करत आहेत. तर, दुसरीकडे झफरने (आमिर दळवी) अंगठीतल्या जीनीवर (प्रणीत भट) ताबा मिळवला आहे.

बगदादच्या लोकांना वाचवण्यासाठी अल्लादिन अंगठी मुच्छडला देऊन टाकतो. मात्र, त्याने पुन्हा एकदा सगळ्यांना वाचवले हे पाहून झफरला राग येतो. अल्लादिन स्वत:वरच खुश असतो की, आपण मुच्छडला खोटी अंगठी दिली आहे. मात्र, मुच्छडला आपली ही योजना माहीत होती आणि मारामारी करताना त्याने खरी अंगठी काढून घेतली, हे समजल्यावर तो हादरतो. झफरला आता खूपच खूश होतो. तो अंगठी घासतो आणि जीनीला बाहेर काढतो. हे पाहून अल्लादिन त्वरित आपल्या जादुई चटईवर बसून बगदादचे नागरिक आणि दिव्यातील जीनीला (राशुल टंडन) वाचवण्यासाठी रवाना होतो. अंगठीतील जीनीच्या उत्पातापासून अल्लादिन सगळ्यांना वाचवू शकेल का?
अंगठीतील जीनीची भूमिका साकारणारा प्रणीत भट म्हणाला,'अंगठीतील जीनी आता झफरच्या ताब्यात असल्याने बगदाद नक्कीच भय आणि नुकसानाच्या वाटेवर आहे. दर आठवड्याला नवे ट्विस्ट घेऊन येत आम्ही आमच्या प्रेक्षकांना अप्रतिम मनोरंजन देत आहोत. कथेतील हे नवे वळण अल्लादिनसाठी काहीसे कठीण आहे.मात्र, तो या समस्येतून कसा मार्ग काढतो, हे पाहणे प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचे ठरेल.'

Web Title: Zafar acquires Genie of the Ring in Sony SAB’s Aladdin: Naam Toh Suna Hoga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.