झैन इमाम 'ही' भूमिका साकारण्यासाठी घेतोय मेहनत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2018 13:44 IST2018-09-18T13:27:40+5:302018-09-18T13:44:03+5:30
झैन इमाम स्टारप्लसवरील नामकरणमधून लोकप्रिय झाला. आता स्टारप्लसवरील सर्वांत लोकप्रिय मालिका इश्कबाज मध्ये तो जादूगाराची भूमिका साकारत आहे.

झैन इमाम 'ही' भूमिका साकारण्यासाठी घेतोय मेहनत
झैन इमाम स्टारप्लसवरील नामकरणमधून लोकप्रिय झाला. आता स्टारप्लसवरील सर्वांत लोकप्रिय मालिका इश्कबाज मध्ये तो जादूगाराची भूमिका साकारत आहे. मोहितची भूमिका करणाऱ्या झैनने ह्या व्यक्तिरेखेसाठी त्याला भरपूर तयारी करावी लागली आहे.
ह्या मालिकेत जादूगाराची भूमिका करताना त्याला ऑनस्क्रीन काही जादूच्या करामतीही करून दाखवायच्या होत्या. तो म्हणाला, “मी प्रथमच छोट्या पडद्यावर जादूगार साकारत आहे. मोहितच्या व्यक्तिरेखेमध्ये तो जादूगार असल्यामुळे तो थोडा रहस्यमयीसुद्धा आहे. ऑनस्क्रीन काही जादूच्या ट्रिक्स करण्यासाठी मी प्रोफेशनली जादू शिकण्याचे ठरवले आणि मगच टेकसाठी गेलो. मी दररोज सेटवर निदान 1 तास वेगवेगळ्या ट्रिक्स करायला शिकायचो आणि मग त्यांचा सराव करायचो. मला आशा आहे की प्रेक्षकांना माझी ही अशी वेगळी भूमिका साकारताना पाहताना आवडेल आणि ते माझे पहिल्यासारखेच कौतुक करतील.” झैनची कामावरील निष्ठा खरोखरीच वाखाणण्यासारखी आहे आणि त्यामुळे त्याचे झैन निश्चितपणे आनंदतील आणि ओबेरॉय यांच्या आयुष्यात त्यांना एक नवीन वळण पाहायला मिळेल.
काही दिवसांपूर्वी या मालिकेत मोहित आणि नॅन्सी या दाम्पत्याचा ओबेरॉय कुटुंबियांच्या जीवनात प्रवेश झाला आहे. नॅन्सीची व्यक्तिरेखा रंगविणारी मंदना करिमी म्हणाली,“इश्कबाझ या टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय मालिकेचा एक भाग बनता आल्यामुळे मी अतिशय आनंदात आहे. हिंदी मनोरंजन मालिकांमध्ये मी प्रथमच भूमिका साकारत असून मला ही भूमिका मिळाल्याबद्दल मी स्वत:ला अतिशय सुदैवी समजते.