Devmanus 2 New Entry : ‘देवमाणूस 2’मध्ये झाली सोनूची एन्ट्री, कोण आहे ही नवी अभिनेत्री?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2022 11:13 AM2022-02-27T11:13:54+5:302022-02-27T11:14:14+5:30

Devmanus 2 ‘देवमाणूस 2’ या मालिकेला आणखी रंजक बनवण्यासाठी त्यात नवे नवे ट्विस्ट आणले जात आहेत. आता या मालिकेत सोनाली उर्फ सोनू या एका नव्या पात्राची एन्ट्री झाली आहे.

zee marathi devmanus 2 serial new entry sonu aka vaishnavi kalyankar know about her | Devmanus 2 New Entry : ‘देवमाणूस 2’मध्ये झाली सोनूची एन्ट्री, कोण आहे ही नवी अभिनेत्री?

Devmanus 2 New Entry : ‘देवमाणूस 2’मध्ये झाली सोनूची एन्ट्री, कोण आहे ही नवी अभिनेत्री?

googlenewsNext

झी मराठीवरील (Zee  Marathi ) ‘देवमाणूस’ ही मालिका प्रचंड गाजली होती. लोकांनी अक्षरश: या मालिकेला डोक्यावर घेतलं होतं. मालिकेचं हे यश पाहूनच या मालिकेचा ‘देवमाणूस 2’  (Devmanus 2) हा दुसरा सीझन आला. पण दुसऱ्या सीझनने मात्र प्रेक्षकांची काहीशी निराशा केली. पहिल्या सीझनच्या तुलनेत ‘देवमाणूस 2’ला म्हणावा तसा प्रतिसाद मिळताना दिसला नाही. अशात या मालिकेला आणखी रंजक बनवण्यासाठी त्यात नवे नवे ट्विस्ट आणले जात आहेत. आता या मालिकेत सोनाली उर्फ सोनू या एका नव्या पात्राची एन्ट्री झाली आहे.

होय, मालिकेत नुकतीच एका नव्या अभिनेत्रीची एन्ट्री झाली. सोनाली उर्फ सोनूची भूमिका अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर  ( Vaishnavi Kalyankar) साकारते आहे. सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असलेली वैष्णवी एक सोशल मीडिया स्टार आहे आणि तिची ही पहिलीच मालिका आहे.
‘देवमाणूस 2’चा नुकताच एक प्रोमो समोर आला आहे. यामध्ये सोनूची एंट्री झाली आहे. ही सोनू खूप श्रीमंत असून आपल्या जागेच्या कायदेशीर व्यवहारात  ती डॉक्टरची मदत मागायला वाड्यात येते. मात्र डॉक्टरची तिची भेट होत नसते. याच सोनूला   बज्या  उचलून डॉक्टरकडे घेऊन येतो, असं प्रोमोत दिसतेय.  

उपचारानंतर सोनू डॉक्टरचे आभार मानत त्यांना डॉक्टर अंकल म्हणते. सोनू मला अंकल का म्हणते, असा प्रश्न डॉक्टरला पडतो. पुढे काय घडते, ते कळेलच. पण तूर्तास आम्ही या सोनूबद्दल अर्थात वैष्णवीबद्दल तुम्हाला सांगणार आहोत.  वैष्णवी ही मूळची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा शहरातली आहे. 

युट्युब वर वैष्णवीचे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात.  ती विविध व्हिडिओतून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसते. धर्मा मुव्हीज क्रिएशनच्या ‘शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील’ या वेबसीरिजमध्ये वैष्णवीने मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. व्हॅलेंटाईन डे आणि धोका, एक परदेसी मेरा अशा व्हिडिओमध्ये देखील ती दिसली आहे.

 

Web Title: zee marathi devmanus 2 serial new entry sonu aka vaishnavi kalyankar know about her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.