माझी तुझी रेशीमगाठ: यश व नेहाचा रोमॅन्टिक व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी, काय आहे कारण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 18:19 IST2022-06-15T18:17:49+5:302022-06-15T18:19:52+5:30
Majhi Tujhi Reshimgath Promo : मालिकेचा एक नवा प्रोमो काही तासांपूर्वीच झी मराठीनं रिलीज केला. या व्हिडीओत नेहा व यश रोमॅन्टिक अंदाजात दिसत आहेत. नेहा व यशचा हा रोमॅन्टिक अंदाज चाहत्यांना चांगलाच भावला आहे. पण काहींना मात्र या रोमॅन्टिक व्हिडीओतील एक गोष्ट नेमकी खटकली.

माझी तुझी रेशीमगाठ: यश व नेहाचा रोमॅन्टिक व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी, काय आहे कारण?
झी मराठीवरील (Zee Marathi) ‘माझी तुझी रेशीमगाठ’ (Majhi Tujhi Reshimgath ) ही मालिका सध्या एका रोमॅन्टिक वळणावर आली आहे. होय, मालिकेत यश आणि नेहा ( Yash-Neha Wedding) यांचं नुकतंच लग्न झालं. नव्या नवराईचं थाटात स्वागत झालं. लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमाही साजरी झाली. आता सुरू झालाये तो नवा संसार. आता नेहा व यश यांचं नातं हळूहळू फुलतांना दिसतंय. अधिक घट्ट होताना दिसतेय. याचा एक नवा प्रोमो काही तासांपूर्वीच झी मराठीनं रिलीज केला. या व्हिडीओत नेहा व यश रोमॅन्टिक अंदाजात दिसत आहेत आणि बॅकग्राऊंडला ‘तू इश्क इश्क सा मेरे’ हे रोमॅन्टिक गाणं वाजतंय.
नेहा व यशचा हा रोमॅन्टिक अंदाज चाहत्यांना चांगलाच भावला आहे. पण काहींना मात्र या रोमॅन्टिक व्हिडीओतील एक गोष्ट नेमकी खटकली आहे. होय, व्हिडीओत वाजणाऱ्या हिंदी रोमँटिक गाण्यावर अनेक चाहत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मराठी मालिकेत मराठी गाण्याऐवजी हिंदी गाणं टाकावं, हे अनेक चाहत्यांना आवडलेलं नाही. याबद्दलची नाराजी अनेकांनी सोशल मीडियावर बोलून दाखवली आहे.
यांना मराठी गाणं मिळत नाही का? प्रत्येक मालिकेत हिंदी गाणं टाकतात, अशी कमेंट एका युजरने केली. हे असले टुकार हिंदी इंग्रजी गाणीच सुचतात का? असा सवाल एकाने केला. प्रेम दाखवायला हिंदी गाणंच कशाला? असा सवाल करत एका युजरने आपला संताप व्यक्त केला आहे.
नेहा-यशच्या संसारात येणार नवं विघ्न येणार...
मालिकेतील यश व नेहाचा नवा नवा संसार फुलताना पाहून प्रेक्षक खुश्श आहेत. पण लवकरच या मालिकेत नवा ट्विस्ट सुद्धा पाहायला मिळणार आहे. होय, नेहाच्या पहिल्या नवऱ्याची लवकरच मालिकेत एन्ट्री होणार असल्याचं कळतंय.
यश नेहाच्या लग्नाची बातमी कळल्यानंतर तो तिला शोधत तिच्या घरापर्यंत पोहोचला आहे. तो परतल्यावर नेहाच्या आयुष्यात कोणतं वादळ येणार? यश व नेहाचा नवा नवा संसार तुटणार का? हे येत्या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे.