घराचं स्वप्न बघणाऱ्या प्रत्येकाची गोष्ट! झी मराठीची नवी मालिका 'लक्ष्मी निवास', हर्षदा खानविलकर दिसणार मुख्य भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 12:21 PM2024-09-13T12:21:55+5:302024-09-13T12:22:25+5:30

झी मराठीवर आणखी एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'लक्ष्मी निवास' असं मालिकेचं नाव असून मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. 

zee marathi new serial laxmi nivas promo out harshada khanvilkar and tushar dalavi to play lead role | घराचं स्वप्न बघणाऱ्या प्रत्येकाची गोष्ट! झी मराठीची नवी मालिका 'लक्ष्मी निवास', हर्षदा खानविलकर दिसणार मुख्य भूमिकेत

घराचं स्वप्न बघणाऱ्या प्रत्येकाची गोष्ट! झी मराठीची नवी मालिका 'लक्ष्मी निवास', हर्षदा खानविलकर दिसणार मुख्य भूमिकेत

सध्या छोट्या पडद्यावर अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. झी मराठी वाहिनीवर नव्या मालिकांचा सपाटाच लागला आहे. एकामागोमाग एक मालिकांच्या घोषणा होत आहेत. काही दिवसांपूर्वीच 'सावळ्याची जणू सावली' या नवीन मालिकेचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला होता. आता झी मराठीवर आणखी एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'लक्ष्मी निवास' असं मालिकेचं नाव असून मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. 

झी मराठीच्या ऑफिशियल सोशल मीडिया अकाऊंटवरुन 'लक्ष्मी निवास' मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये स्कूटरवर एक जोडपं दिसत आहे. त्यांच्यासमोर एक बांधकाम सुरू असलेला बंगलाही दिसत आहे. "स्वत:च्या घराचं स्वप्न बघणाऱ्या प्रत्येकाची गोष्ट...लक्ष्मी निवास" असं या प्रोमोमध्ये म्हणण्यात आलं आ्हे. या प्रोमोमधील आवाज अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांचा असल्याचा प्रेक्षकांनी ओळखलं आहे. त्यामुळे या मालिकेत हर्षदा खानविलकर मुख्य भूमिकेत असल्याची चर्चा रंगली आहे. 


"‘घर नावाचं स्वप्न’ कुणी पाहिलं तर कुणी जगलं...नवी मालिका ‘लक्ष्मी निवास’ येतेय तुमच्या भेटीला लवकरच..." असं कॅप्शन या प्रोमोला देण्यात आलं आहे. हर्षदा खानविलकर यांच्याबरोबरच या मालिकेत अभिनेता तुषार दळवी मुख्य भूमिकेत असल्याचं म्हटलं जात आहे. ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'लक्ष्मी निवास' ही मालिका एका कन्नड मालिकेचा रिमेक आहे. 
 

Web Title: zee marathi new serial laxmi nivas promo out harshada khanvilkar and tushar dalavi to play lead role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.